Extramarital Affair : अर्ध्या रात्री अचानक मुलगी बॉयफ्रेंडच्या घरी येऊन धडकली, तिला काय माहित होतं, असं काही डोळ्यांना पहावं लागेल
Extramarital Affair : युवकाची काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून बंगळुरुतील एका युवतीशी मैत्री झालेली. दोघांची मैत्री हळूहळू पुढे प्रेमात बदलली. तिला कुठे माहित होतं, असं काही पहायला मिळेल. ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

आपल्या पार्टनरला चीट करणं आजच्या डेटमध्ये सामान्य बाब झाली आहे. अनेक असे लोक असतात जे लग्नानंतरही आपल्या पार्टनरला चीट करतात. विवाहबाह्य संबंध ठेवतात. एका व्यक्तीने असचं केलं. विवाहित असूनही अविवाहित असल्याचं भासवलं. एक गर्लफ्रेंड पटवली. एक दिवस अचानक अर्ध्यारात्री गर्लफ्रेंड त्याच्या घरी येऊन धडकली. ज्यावेळी तिला प्रियकराचं खरं रुप दिसलं, त्यावेळी तिने तिथेच जाम राडा घातला. मारहाणीपर्यंत विषय गेला. मग गर्लफ्रेंडने पोलिसांना बोलावलं. उत्तर प्रदेशच्या गोरखपुरमधील हे प्रकरण आहे.
कँट पोलीस ठाणे क्षेत्रात येणाऱ्या पॉश वस्ती बेतियाहातामधील हे प्रकरण आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे प्रेमसंबंध जुळले. बंगळुरुहून अर्ध्यारात्री आलेली युवती प्रियकराच्या घरात घुसली. तिथे त्याच्या पत्नीला पाहून तिचा पारा चढला. त्यावेळी तिने फक्त वाद घातला नाही, तर त्याच्यासोबत मारहाण सुद्धा केली. मग आपण यात अडकू नये म्हणून तिने पोलिसांना फोन लावला. बोलली, एक महिलेने जीवन संपवलय, तुम्ही लवकर या. घटनास्थळी पोहोचलेले पोलीस तिथली परिस्थिती पाहून थक्क झाले.
दोघांमध्ये जवळीक वाढली
बेतियाहाता येथील युवकाची काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून बंगळुरुतील एका युवतीशी मैत्री झालेली. दोघांची मैत्री हळूहळू पुढे प्रेमात बदलली. युवक आधीच विवाहित होता. त्याने ही गोष्ट लपवून ठेवली. सोशल मीडियावर रोज बोलणं सुरु झालं. दोघांमध्ये जवळीक वाढली.
लवकर पोलीस पाठवा
युवकाने युवतीला लग्नाचं आश्वासन दिलं होतं. मागच्या आठवड्यात युवती कोणाला न सांगता बंगळुरुहून गोरखपुरला आली. शुक्रवारी रात्री ती थेट प्रियकराच्या घरात घुसली. तिथे पोहोचल्यानंतर तिला युवकाच्या पत्नीबद्दल समजताच तिने जाम गोंधळ घातला. दोघींमधला वाद हाणामारीत बदलला. पत्नीने युवकाला मध्यस्थीसाठी सांगितल्यानंतर मुलगी अजून भडकली. तिने कंट्रोल रुमला फोन करुन सांगितलं की, “एका महिलेला तिच्या पतीने छळलं. तिने जीवन संपवलय. लवकर पोलीस पाठवा” पोलीस आल्यानंतर रात्री दीड वाजेपर्यंत त्यांनी प्रकरण समजून घेतलं. या प्रकरणात कोणीही लिखित तक्रार दिलेली नाही.
