
नवरा-बायकोच्या नात्यात दगाबाजीच अस एक प्रकरण समोर आलय की, ते वाचून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. पत्नीवर फसवणुकीचा आरोप करत एक युवक शनिवारी दुपारी मोबाइल टॉवरवर चढला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी युवकाची समजूत घालून त्याला खाली उतरवलं. पण तो पत्नी विरोधात कारवाईची मागणी करत आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील हे प्रकरण आहे. गोला पोलीस ठाणे क्षेत्रातील बेलपार गावच हे प्रकरण आहे. इथे राहणाऱ्या युवकाने पत्नीवर फसवणुकीचा आरोप केला आहे.
युवकाने सांगितलं की, त्याने शेती विकून पत्नीच्या नर्सिंग कोर्सचा खर्च उचलला. त्यानंतर तिला नीट परीक्षेच्या तयारीसाठी वेळ दिला. इतकच नाही, पत्नीने रेल्वेची परीक्षा सुद्धा दिली. त्यात यश मिळालं नाही, तेव्हा पत्नी गोरखपुरच्या खासगी रुग्णालयात नर्स म्हणून रुजू झाली. त्यानंतर तिने तिथेच भाड्यावर घर घेतलं. नवरा गोरखपूरच्या तिच्या घरी महिन्याच किराणा सामान भरायचा. तिला काही कमी पडणार नाही, याची काळजी घ्यायचा.
रुमच टाळ उघडताच बसला मोठा धक्का
नवऱ्याने सांगितलं की, आठवड्याभरापूर्वी तो अयोध्येत श्री रामललाच्या दर्शनासाठी गेला होता. रात्री उशिरा तो पत्नीच्या गोरखपूर येथील घरी गेला. त्यावेळी पत्नीच्या रुमला बाहेरुन टाळ होतं. त्याने घर मालकाला सांगून टाळ उघडायला लावलं. तो रुमच्या आतमध्ये गेला, तेव्हा पत्नी परपुरुषासोबत नको त्या अवस्थेत होती. दोघांवर प्रश्नांची सरबत्ती सुरु केल्यानंतर सोबत असलेला युवक तिथून पळून गेला.
टॉवर जवळ मोठी गर्दी जमा झाली
पतीने पत्नीला तिच्या विश्वासघाताबद्दल विचारलं. त्यावेळी ती उत्तर देऊ शकली नाही. पण नंतर ती त्याच युवकासोबत राहू लागली. नवऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली, पण त्याचा उपयोग झाला नाही. पोलीसही तक्रारीची दखल घेत नाहीत, हे पाहून युवक शनिवारी दुपारी गावातील मोबाइल टॉवरवर चढला. टॉवर जवळ मोठी गर्दी जमा झाली. पोलीस तिथे आल्यानंतर त्यांनी त्याला समजावून खाली उतरवलं.