AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 वर्ष अफेअर, लग्नानंतर पायल रानीला शिकवून इन्सपेक्टर बनवलं, मग तिने…आता तुम्हीच ठरवा या केसमध्ये कोण खरं? कोण खोटं?

पती गुलशनने सांगितलं की, माझं आणि पायलच वर्ष 2016 पासून अफेअर होतं. आम्ही दोघे एकत्र शिकत होतो. वर्ष 2021 मध्ये कोर्ट मॅरेज केलं. त्यांनी कुटुंबियांना राजी केलं. पायल माझ्यासोबत घरी रहायला आली. मी पायलला शिकवून इंस्पेक्टर बनवलं.

5 वर्ष अफेअर, लग्नानंतर पायल रानीला शिकवून इन्सपेक्टर बनवलं, मग तिने...आता तुम्हीच ठरवा या केसमध्ये कोण खरं? कोण खोटं?
Husband-Wife
| Updated on: Jan 09, 2026 | 4:20 PM
Share

उत्तर प्रदेशात हापूडा येथे राहणाऱ्या गुलशनने पत्नीला शिकवून इन्सपेक्टर बनवलं. त्याच्यावरच आता पत्नीने हुंड्यासाठी छळ आणि त्रास दिल्याचा FIR नोंदवला आहे. यावर पती गुलशननने एसपी कुंवर ज्ञानंजय सिंह यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. 13 नोव्हेंबरचा 2025 रोजी इन्सपेक्टर पत्नी पायल रानीने पती गुलशन आणि त्याच्या कुटुंबातील सहासदस्यांवर हापूड नगर कोतवाली येथे गुन्हा दाखल केला. जनपद बरेलीमध्ये तैनात महिला सब इंस्पेक्टर पायल रानीने 13 नोव्हेंबर 2025 रोजी पोलिस अधीक्षक हापुडा यांच्याकडे तक्रार केली. हापुड नगर कोतवालीमध्ये गुन्हा दाखल केला. पायल रानीचा आरोप आहे की, तिचं लग्न 2 डिसेंबर 2022 रोजी पिलखुवा कोतवाली क्षेत्र गावातील गुलशन बरोबर झालं. लग्नाच्यावेळी सासरच्या खूप हुंडा घेतला. पण सासरच्यांच इतक्या हुंड्याने पोट भरलं नाही.

लग्नानंतर पती गुलशन, सासू-सासरे आणि अन्य नातेवाईकांनी अतिरिक्त हुंडा मागायला सुरुवात केली असा आरोप आहे. सासरकडची लोकं 10 लाख रुपये कॅश आणि एका कारची मागणी करत होते असं पायल रानीने तक्रारीत म्हटलं होतं. मागणी पूर्ण केली नाही तेव्हा त्रास वाढला. आरोप आहे की सासरच्यांनी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्‍या छळ सुरु केला. निदर्यतेने मारहाण केली. एसिड फेकून जीवे मारण्याची धमकी दिली. या धमक्या इतक्या गंभीर होत्या की, पायल रानीला तिच्या जीवाला धोका वाटू लागला.

पोलीस अधीक्षकांनी काय आदेश दिला?

पोलीस अधीक्षक कुंवर ज्ञानंजय सिंह यांच्या आदेशाने पोलीस स्टेशनमध्ये पायल रानीच्या तक्रारीवरुन पती गुलशनसह सासरच्या सहाजणांविरोधात हुंड्यासाठी छळ, मारहाण, धमकी आणि अन्य कलमांखाली गुन्हा नोंदवला.

सर्व सत्य चौकशीनंतरच समोर येईल

पती गुलशनने सांगितलं की, माझं आणि पायलच वर्ष 2016 पासून अफेअर होतं. आम्ही दोघे एकत्र शिकत होतो. वर्ष 2021 मध्ये कोर्ट मॅरेज केलं. त्यांनी कुटुंबियांना राजी केलं. कुठलाही हुंडा न घेता हिंदू पद्धतीने 2022 मध्ये लग्न झालं. पायल माझ्यासोबत घरी रहायला आली. मी पायलला शिकवून इंस्पेक्टर बनवलं. मेहनतीने कमावलेल्या पैशाने तिला शिकवलं. तिचं समर्थन केलं. त्यामुळे तिला नोकरी लागली. पण आता पायल रानीने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर खोटा आरोप करुन गुन्हा दाखल केला. गुलशनने हापुडाचे एसपी कुंवर ज्ञानंजय सिंह यांची भेट घेऊन निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. सर्व सत्य चौकशीनंतरच समोर येईल.

सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल.
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्...
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्....
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा.
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल.
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास.
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला.
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात.
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं.
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?.
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला.