पती, पत्नी आणि वो तिघेही पोलीस दलात, अफेअर अशा पद्धतीने उघड झालं की… पोलीस विभागात खळबळ

साहेब, 6 फेब्रुवारी 2023 रोजी माझं लग्न युवतीशी झालं होतं. लग्नानंतर चार दिवसांनी विदाईचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पत्नी 9 दिवसच माझ्याकडे राहिली. पत्नी स्वत: कॉन्स्टेबल आहे. म्हणून ती तिच्या ड्युटीवर परतली.

पती, पत्नी आणि वो तिघेही पोलीस दलात, अफेअर अशा पद्धतीने उघड झालं की... पोलीस विभागात खळबळ
extramarital affair
| Updated on: Sep 01, 2025 | 1:52 PM

कधीही कुठल्या व्यक्तीने दुसऱ्याशी दगाफटका किंवा फसवणूक करु नये. कुठल्याही नात्यात एकदा धोका मिळाला की, माणूस पूर्णपणे कोसळून जातो. मग, ते नातं मैत्रीच असो प्रेमाचं किंवा पती-पत्नीच. आजच्या जगात तुम्ही कुठल्याही व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेऊ शकत नाहीत. उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये असच एक प्रकरण समोर आलय. लग्नानंतर एक महिला पोलीस आपल्या कॉन्स्टेबल पतीला धोका देत होती. तिचे परपुरुषासोबत संबंध होते. पतीने जेव्हा दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं, तो पार कोसळून गेला.

पतीला आता पत्नीपासून घटस्फोट हवा आहे. पती स्वत: पोलीस दलात आहे. पत्नी आणि तिचा प्रियकर सुद्धा पोलीस दलातच आहे. पतीने पोलिसांना सांगितलं की, साहेब, 6 फेब्रुवारी 2023 रोजी माझं लग्न बलिया येथील युवतीशी झालं होतं. लग्नानंतर चार दिवसांनी विदाईचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पत्नी 9 दिवसच माझ्याकडे राहिली. पत्नी स्वत: कॉन्स्टेबल आहे. म्हणून ती तिच्या ड्युटीवर परतली. पत्नी कासया पोलीसर ठाण्यात तैनात आहे.

आतमधून सांगत होती की, मी दरवाजा उघडणार नाही

पीडित पतीने सांगितलं की, माझ्या पत्नीच दुसऱ्या कॉन्स्टेबल सोबत अफेयर सुरु होतं. मला याची कल्पना नव्हती. मी जेव्हा पत्नीला भेटायला, कासया येथे गेलो, तेव्हा ती दरवाजा उघडत नव्हती. आतमधून सांगत होती की, मी दरवाजा उघडणार नाही. मला संशय आला. आतमध्ये दुसरा कोणीतरी पुरुष आहे. मी 112 नंबरवर फोन करुन पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी दरवाजा उघडला, तेव्हा दोघेही अर्धनग्न अवस्थेत होते.

पतीला आता पत्नीपासून घटस्फोट हवा

माहितीनुसार, दोघांना त्या अवस्थेत पाहून पती खवळला. त्याने पत्नीच्या प्रियकराला लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरु केली. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी मध्यस्थी करुन प्रकरण शांत केलं. आरोपी प्रियकराला पकडून पोलीस आपल्यासोबत चौकीत घेऊन गेले. पतीला आता पत्नीपासून घटस्फोट हवा आहे.

या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. सध्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. महिला आरक्षमी कसया पोलीस ठाण्यात तैनात आहे. पती सुद्धा पोलीस लाइनमध्ये कार्यरत आहे. प्रेमी सेवरही पोलीस ठाण्यात आहे.