तांत्रिकाने महिलेला वश केलं, तिच्या अंगावरचा एक-एक…कुटुंबियांनी दरवाजा उघडताच समोरच दृश्य बघून हादरले

त्याने सर्व कुटुंबियांना रुमबाहेर जाण्यास सांगितलं. आपली काळी कृत्य करण्यासाठी आतून दरवाजा बंद केला व महिलेवर जादूटोना केला. त्यावेळी तांत्रिकाने पतीसह कुटुंबातील सर्व सदस्यांना खोलीत प्रवेश करण्यापासून रोखलं.

तांत्रिकाने महिलेला वश केलं, तिच्या अंगावरचा एक-एक...कुटुंबियांनी दरवाजा उघडताच समोरच दृश्य बघून हादरले
Representative Image
Image Credit source: Representative Image
| Updated on: Jun 28, 2025 | 1:09 PM

उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये पोलिसांनी एका भोंदू तांत्रिकाला अटक केली आहे. त्याच्यावर महिलेशी छेडछाड केल्याचा आरोप आहे. एका आजारी महिलेच्या उपचारासाठी नातेवाईकांनी तांत्रिकाला घरी बोलावलं होतं. त्यावेळी तांत्रिक उपचाराच्या बहाण्याने त्या महिलेला एका खोलीत घेऊन गेला. तिथे त्या भोंदू तांत्रिकाने महिलेला वश करुन तिचे कपडे उतरवण्यास सुरुवात केली. महिला सुद्धा त्याचं, तो जे काही सांगेल ते ऐकत गेली. त्याचवेळी तांत्रिकाने तिची छेडछाड सुरु केली. महिलेने त्याचा विरोध सुरु केला. पण तांत्रिक काही ऐकून घेत नव्हता.

महिलेने अखेर आरडा-ओरडा सुरु केला. तिचा आवाज ऐकून कुटुंबीय खोलीत आले. त्यावेळी महिला अर्धनग्न अवस्थेत होती. कुटुंबियांना तांत्रिकाच्या हरकती समजल्या. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं. सूचना मिळताच पोलीस तिथे आले. तांत्रिकाला अटक करुन घेऊन गेले. त्याच्याविरोधात पुढील कारवाई सुरु आहे.

आतून दरवाजा बंद केला

आशियाना क्षेत्रातील हे प्रकरण आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी छत्रपाल सिंह म्हणाले की, “महिला आजारी असल्याने तिच्या पतीने झाड फूंक करण्यासाठी एका तांत्रिकाला बोलावलेलं. तांत्रिकाच्या मनात पाप होतं. म्हणून त्याने सर्व कुटुंबियांना रुमबाहेर जाण्यास सांगितलं. आपली काळी कृत्य करण्यासाठी आतून दरवाजा बंद केला व महिलेवर जादूटोना केला. तिला अर्धनग्न केलं. या दरम्यान महिलेने आरडाओरडा सुरु केला. त्यावेळी तांत्रिकाने पतीसह कुटुंबातील सर्व सदस्यांना खोलीत प्रवेश करण्यापासून रोखलं”

पोलीस घटनास्थळी पोहोचले

कुटुंबियांकडून माहित मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. आरोपी तांत्रिकाला ताब्यात घेतलं. महिलेच्या पतीच्या तक्रारीवरुन तांत्रिकाविरोधात छेडछाड, अश्लीलतेसह अनेक कलमांखाली गुन्हा नोंदवून कारवाई केली.