
नवरा-बायकोच नातं म्हटलं की, त्यात भांडणं ही आलीच. कुठल्याही नवरा-बायकोमध्ये भांडण होत असतात, त्याशिवाय नात्याला मजा नाही असं म्हणतात. अनेकदा ही भांडण किरकोळ स्वरुपाची असतात. शाब्दीक वादावादी होते. पण काहीवेळेला विषय हात उचलण्यापर्यंत जाऊन पोहोचतो. उत्तर प्रदेश मथुरा येथे एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. शुक्रवारी येथे राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये वाद झाला. हे भांडण इतकं विकोपाला गेलं की, नवऱ्याने बायकोचे ओठ चावले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाद वाढल्यानंतर नवऱ्याने बायकोवर हल्ला केला. त्याने पत्नीचे ओठ इतक्या भयानक पद्धतीने चावले की, 16 टाके घालावे लागले. पीडित महिला बोलू शकत नाहीय, अशी तिची स्थिती आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनुसार पीडित तिच्यासोबत काय घडलं? हे तोंडाने सांगू शकत नाहीय. म्हणून तिने कागदावर जे काही घडलं ते लिहून दिलं. महिलेने पती, दीर आणि सासू विरोधात छळाची तक्रार नोंदवली. मगोर्राचे ठाणा प्रभारी मोहित तोमर यांनी सांगितलं की, “शुक्रवारी संध्याकाळी नवरा घरी आला. त्याने वाद घालायला सुरुवात केली. मारहाण सुरु केली”
त्यामुळे भरपूर रक्तस्त्राव
महिलेने पतीला शांत रहायला सांगितलं, तेव्हा त्याने अचानक दातांनी ओठांचा जोरदार चावा घेतला. त्यामुळे भरपूर रक्तस्त्राव झाला. अशावेळी घरात असलेली तिची बहिण मदतीसाठी आली, तेव्हा तिलाही मारहाण केली महिलेचा आरोप आहे की, तिने नवऱ्याच्या वर्तनाची तक्रार सासू आणि दीराकडे केल्यानंतर त्यांनी सुद्धा शिवीगाळ करत मारहाण केली.
कोण गायब झालं?
पोलिसांनी सांगितलं की, या घटनेबद्दल कळल्यानंतर महिलेचे वडिल तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. नवरा विष्णू, सासू आणि दीराविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सांगितलं की, महिलेच्या ओठांवर 16 टाके घालण्यात आले आहेत. पती-पत्नी घरगुती कारणांवरुन भांडण झालं होतं. या घटनेनंतर दीर आणि सासू घरातून गायब आहे. त्यांच्या अटकेसाठी शोध सुरु आहे.