AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope Today 18th March 2026 : शेजारणीपासून जपून राहा, नाही तर… या राशीवाल्यांचं आज काही खरं नाही, तुमची तर रास ही नाही ना?

Horoscope Today 18th March 2026, Wednesday in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य.

Horoscope Today 18th March 2026 : शेजारणीपासून जपून राहा, नाही तर... या राशीवाल्यांचं आज काही खरं नाही, तुमची तर रास ही नाही ना?
| Updated on: Mar 18, 2026 | 7:30 AM
Share

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 18th March 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

आजचा तुमचा दिवस प्रगतीचा आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचं चीज होणार आहे. पण एखाद्या सहकाऱ्याचं बोलणं तुम्हाला वेदना देऊ शकतं. तुमचं एखादं सरकारी काम बऱ्याच काळापासून लटकलेलं असेल तर ते काम आज पूर्ण होण्याचे संकेत आहेत. जमीनजुमल्याशी संबंधित प्रकरणावर विशेष लक्ष द्या. दुसऱ्यांचं ऐकून मन विचलित करून घेऊ नका. तुमच्या लक्ष्यावर फोकस ठेवा. आरोग्याच्या बाबत सतर्क राहणे इष्ट ठरेल.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी भलताच आनंदाचा असणार आहे. कोणत्याही कामात घाईत निर्णय घेऊ नका. नाही तर परिणाव वेगळे येतील. तुमची ऊर्जा आणि उत्साह आज कायम राहिल. त्यामुळे तुम्ही तुमची कामे पटापट पूर्ण कराल. कुटुंबातील एखाद्या सदस्याबाबत लागून राहिलेली चिंता आता हळूहळू दूर होईल. व्यापाराशी संबंधित कामासाठी प्रवास घडेल. विद्यार्थ्यी मानसिक तणावातून बाहेर पडतील.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

आज तुम्हाला कोणत्याही कामात निष्काळजीपणा करून चालणार नाही. वडिलांशी एखाद्या कारणावरून मतभेद असेल तर चर्चेने सोडवा. त्यासाठी ताणून धरू नका. मुलांकडून आनंद वार्ता ऐकायला येईल. वाहन चालवताना सावध राहा. किरकोळ दुखापत होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी बॉसच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्यासाठी ते योग्य होणार नाही. तुमच्या प्रमोशनवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आणि मौजमस्तीचा असणार आहे. तुम्ही कुटुंबासोबत मस्त दिवस घालवाल. त्यामुळे सर्व संभ्रम दूर होतील. मुलांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न होईल. जीवनसाथीला नोकरीत प्रमोशन मिळाल्याची बातमी ऐकून घरातील वातावरण अधिकच आनंदमय असेल. आज एखाद्या धार्मिक कार्यात भाग घ्याल. सोसायटीच्या कामात लक्ष घालाल. शेजारणीशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जपून राहा. नाही तर उगाचच मनस्ताप होण्याची वेळ येईल. चारचौघात अपमान होण्याची शक्यता आहे.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

आज तुमच्या धाडस आणि पराक्रमाचं कौतुक होईल. पण लोकांकडून काम करून घेण्यासाठी तुम्हाला थोडं सबुरीने घ्यावं लागेल. डोक्यावर बर्फ ठेवून परिस्थिती हाताळावी लागेल. कारण तुमचा कडक स्वभाव अनेकांना त्रासदायक ठरू शकतो. अनोळखी लोकांपासून दूरच राहणं योग्य ठरेल. कौटुंबिक समस्या वाढणार असल्याने थोडं टेन्शन येईल. पण समजूतदारपणे परिस्थिती हाताळल्यास सर्व गोष्टी अटोक्यात येतील. मुलांना केलेलं वचन आज तुम्हाला पूर्ण करावं लागणार आहे.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी निश्चितपणे फलदायी ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्याशी किरकोळ वाद होतील. पण नंतर प्रकरण निवळेल. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे जे विद्यार्थी स्वप्न पाहत आहेत, त्यांना आज चांगली बातमी कानी येण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुरू असलेला जुना वाद आज मिटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबात सौहार्दाचा वातावरण असेल. नवीन वाहन खरेदी करण्याचा योग आहे. मात्र, वडिलांशी चर्चा करूनच वाहन खरेदी करा.

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

आजच्या दिवशी अनावश्यक खर्चांपासून दूर राहा. एखाद्या सरकारी कामात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. कोणी तरी या कामात बाधा टाकण्याचा प्रयत्न करेल. देवाण-घेवाणाशी संबंधित एखादं प्रकरण कोर्टकचेरीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आज कपडे किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी खरेदी कराल. त्यामुळे तुमचा खर्च वाढणार आहे. घरी पाहुण्यांचं आगमन होणार असल्याने घरातील वातावरण आनंदी होईल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. एखादं महत्त्वाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही एखाद्या छोट्या मोठ्या पार्टीचं आयोजन कराल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय असेल तर फायद्याचा ठरणार आहे. चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसाय अधिक वाढवण्यासाठी मोठा प्लान करण्याची शक्यता आहे. नवीन वाहन खरेदी करण्याची प्रबळ इच्छा होईल. तुमच्या आवाक्यात असेल तरच वाहन खरेदी करा.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

व्यापारात आज मोठा लाभ होणार आहे. तुमची मिळकत पूर्वीपेक्षा अधिक होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तुम्हाला मिळतील. तुमचं दीर्घकाळापासून अडकलेलं सरकारी काम पूर्ण होईल. मुलाला एखाद्या मोठ्या कोर्ससाठी प्रवेश घेऊन द्याल. फिरायला गेल्यावर तुम्हाला महत्त्वाची बातमी मिळेल. त्याचा भविष्यात खूप फायदा होणार आहे. प्रेयसीपासून चार हात लांब राहा. नाही तर अनावश्यक खर्च वाढेल. प्रेयसीशी विनाकारण वाद होतील. त्यामुळे दोघांमध्ये अबोला होईल.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी यशस्वी ठरणारा आहे. पण घरात बायकोसोबत थोडीबहूत कुरबूर होईल. नवऱ्याच्या वागण्याचा त्रास वाटेल. कुटुंबातील एखादा सदस्य आजारी पडण्याची शक्यता असून त्यासाठी रुग्णालयात धावपळ करावी लागणार आहे. कामावरील सहकाऱ्याने दांडी मारल्याने तुमच्यावरच कामाचा सर्वाधिक बोजा येईल. महिलांसाठी आजचा दिवस अधिक खर्चिक आहे. साड्यांवर अधिक खर्च करू नका. गावाकडे जाण्याचा योग आहे. धार्मिक कार्यात उत्साहाने भाग घ्याल.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

आजचा दिवस हा परोपरकाराचा ठरणार आहे. आज तुमच्या हातून चांगले कार्य घडतील. इतरांना मदत कराल. दुसऱ्यांच्या प्रकरणात विनाकारण लक्ष घालू नका. कामाच्या ठिकाणी बॉससोबत वाद होईल. पण संयमाने घ्या. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी अधिककाळ अबोला धरणं तुमच्या अंगलट येऊ शकतं. त्यामुळे तुम्हालाच मानसिक त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी इतरांच्या सांगण्यानुसार वागू नका. तुमच्या मनाला जे पटत त्यावरच निर्णय घ्या. पैशांची बचत करा. नाहीतर येणाऱ्या काळात आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागू शकतं.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

आज तुम्ही आवश्यक गोष्टींवरच खर्च करा. नाही तर नुकसान होईल. वाढते खर्च तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. एखाद्या आजारामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होईल. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. दूरचा प्रवास टाळा. कामाच्या ठिकाणी तुमच्या जुन्या चुकांची उजळणी होऊ शकते. नको त्या सहकाऱ्यांमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. राजकारणातील लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्... 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...; खासदार फुटीनंतर दादा भुसेंचं मोठं विधान
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा पलटवार; म्हणाले, त्यासाठी ठाकरेंना...
बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
Rohit Pawar On Operation Tiger | बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार, महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Sanjay Raut Full Press | 6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार – आता महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकड
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकडून अधिकृत पत्र जारी, काय घडलं?
खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक!
Yawatmal | खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक! संजय देशमुखांचा पुतळा जाळत संताप!