AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : सराफा बाजारात मोठा उलटफेर, आज तर सोन्याने … जाणून घ्या तुमच्या शहरातले दर

Gold Price Today 19 June 2026 Latest News Updates in Marathi : देशांतर्गत शेअर बाजारातील तेजी आणि डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्यामुळे सोन्याच्या दरांवर परिणाम झाला आहे. आज सराफा बाजारात मोठा उलटफेर झाला असून सोन्याच्या किमतीतही मोठा बदल झाला आहे. आज देशांतील प्रमुख शहरात 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर किती ?

Gold Price Today : सराफा बाजारात मोठा उलटफेर, आज तर सोन्याने ... जाणून घ्या तुमच्या शहरातले दर
19 जून रोजी सोन्याचे दर समोर
| Updated on: Jun 19, 2026 | 9:53 AM
Share

विविध आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्याचे देशांतर्गत बाजारावर होणारा परिणाम यामुळे देशात सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ झालेली दिसून येत आहे. देशात सोन्याच्या भावातील घसरण सुरूच आहे. 19 जूनच्या सकाळी बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये आणखी घट झाली. राजधानी दिल्लीत 24 -कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,49,650 रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्याआधीच्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 % शुद्ध सोन्याचा भाव 960 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1,53,400 रुपयांवर स्थिरावला होता. देशांतर्गत शेअर बाजारातील तेजी आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वधारल्यामुळे सोन्याच्या भावावर घसरणीचा दबाव दिसून आला. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट गोल्ड’चा (तात्काळ वितरणासाठीचे सोने) व्यवहार प्रति औंस 4266.47 डॉलर्सवर होत आहे.

दरम्यान, फेडरल रिझर्व्हचे अधिकारी केविन वॉर्श यांच्या विधानांवरून असं सूचित होतं की, जर अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत राहिली, तर 2026 मध्ये व्याजदरात एकदा वाढ होऊ शकते. सोन्यासारख्या मौल्यवान धातूंसाठी ही एक नकारात्मक बाब आहे. जूनमधील बैठकीत फेडरल रिझर्व्हने आपले बेंचमार्क व्याजदर 3.5%-3.75% या पातळीवर स्थिर ठेवले होते.

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर

दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,49,650 रुपये तर 22-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,37,190 रुपये आहे.

मुंबई आणि कोलकातामध्ये 22-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,37,040 रुपये आहे, तर 24-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,49,500 रुपये आहे.

चेन्नईमधील 24 -कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,51,170 रुपये आहे. 22-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,39,490 रुपये आहे.

तर पुणे आणि बंगळुरू ​​या दोन्ही शहरांमध्ये 24 -कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,49,500 रुपये आहे आणि 22-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,37,040 रुपये आहे.

शहर 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर (₹) 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर (₹)
दिल्ली 137190 149650
मुंबई 137040 149500
अहमदाबाद 137090 149550
चेन्नई 139490 152170
कोलकाता 137040 151360
हैदराबाद 137040 151360
जयपुर 137190 149650
भोपाल 137090 149550
लखनऊ 137190 149650
चंडीगढ़ 137190 149650

चांदीचं काय झालं ?

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीचा भाव प्रति किलो 2,59,900 रुपयांपर्यंत खाली आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट’ चांदीचा भाव प्रति औंस 68.17 डॉलर्स इतका आहे. सोने आणि चांदीचे देशांतर्गत भाव हे देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांमुळे प्रभावित होतात.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?