AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चूक मान्य करणं..; अमिताभ बच्चन यांची पोस्ट अन् तुटून पडले नेटकरी, जया बच्चन यांच्याशी लग्नावरूनही घेरलं

अमिताभ बच्चन यांनी बुधवारी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली. ही पोस्ट वाचून नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी जया बच्चन यांच्याशी लग्नावरूनही बिग बींना ट्रोल केलं आहे.

चूक मान्य करणं..; अमिताभ बच्चन यांची पोस्ट अन् तुटून पडले नेटकरी, जया बच्चन यांच्याशी लग्नावरूनही घेरलं
अमिताभ बच्चनImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 19, 2026 | 9:38 AM
Share

बॉलिवूडचे ‘शहनशाह’ अर्थात अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर किंवा ब्लॉगमध्ये ते काही ना काही पोस्ट लिहितच असतात. बुधवारी त्यांनी एक्सवर अशीच एक छोटी पोस्ट लिहिली होती. मात्र त्यावरून नेटकऱ्यांमध्ये मोठ्या चर्चांना उधाण आलं. ‘गलती को मान लेना कोई गलत बात नहीं’ (चूक मान्य करणं यात काहीच चुकीचं नाही) अशी पोस्ट त्यांनी लिहिली होती. ही पोस्ट अत्यंत छोटी असली तरी नेटकरी त्याचे अनेक अर्थ काढत आहेत. या पोस्टवर अनेकजण बिग बींना ट्रोलसुद्धा करत आहेत. ‘चूक मान्य करण्यात काहीच गैर नाही’ असं म्हणणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्यावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. काहींनी पेट्रोलच्या वाढत्या किंमतीबद्दलच्या त्यांच्या 2012 मधील ट्विटची आठवण करून दिली, तर काहींनी जया बच्चन यांच्यासोबतच्या त्यांच्या लग्नावरही प्रश्न उपस्थित केले.

डिसेंबर 2025 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत जया बच्चन यांना अमिताभ बच्चन यांचं लग्नाबद्दल काय मत आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या, “मी त्यांना याबद्दल कधी विचारलं नाही. पण कदाचित ते म्हणतील, ही माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती. अर्थात हे मला ऐकायचं नाहीये.” आता बिग बींनी जी पोस्ट लिहिली आहे, त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना जया बच्चन यांच्यासोबतच्या लग्नाची आठवण करून दिली आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींवर त्यांनी उघडपणे बोलावं, अशी मागणी करण्यात आली.

अमिताभ बच्चन यांचं ट्विट-

‘तुम्ही तुमची चूक आता मान्य करा. आजकाल तुम्हाला पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमती दिसत नाहीत. विद्यार्थ्यांवर होणारा अत्याचार आणि पेपर लीकच्या समस्या दिसत नाहीत’, असा टोमणा एका युजरने मारला. तर ‘सर जया बच्चन यांच्यासोबतचं तुमचं लग्न हीसुद्धा एक चूकत होती’, असं दुसऱ्याने म्हटलंय. नेटकऱ्यांनी बिग बींच्या ट्विटवर विविध प्रतिक्रिया देत त्यांच्यावर टीका केली आहे. बिग बी चालू घडामोडींवर किंवा समस्यांवर बोलणं टाळतात, अशी तक्रार अनेकदा नेटकऱ्यांकडून करण्यात येते. यावर अमिताभ बच्चन यांनीसुद्धा कधीच प्रतिक्रिया दिली नाही.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?