AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याचा श्वास थांबला, हृदय धडधडण बंद झालं, पण डॉक्टरांनी हार मानली नाही; मग जे घडलं तो चमत्कारच!

नागपूरच्या डॉक्टरांनी सलग १०० मिनिटे सीपीआर देऊन एका ११ वर्षीय मुलाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे. जनरेटर अंगावर पडल्याने हा मुलगा गंभीर जखमी झाला होता.

त्याचा श्वास थांबला, हृदय धडधडण बंद झालं, पण डॉक्टरांनी हार मानली नाही; मग जे घडलं तो चमत्कारच!
100 Minutes CPR
| Updated on: Mar 18, 2026 | 7:58 AM
Share

वैद्यकीय क्षेत्रात अशक्य वाटणारी गोष्ट नागपूरच्या डॉक्टरांनी शक्य करून दाखवली आहे. एका भीषण अपघातात मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या ११ वर्षीय बालकाला सलग १०० मिनिटे सीपीआर (CPR) देऊन डॉक्टरांनी पुनर्जन्म दिला आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार साधारणपणे २० ते ३० मिनिटे सीपीआर दिला जातो. मात्र या प्रकरणात डॉक्टरांनी दाखवलेला संयम आणि जिद्द एका बालकासाठी जीवदान ठरली आहे.

नेमकी घटना काय?

राहुल (नाव बदललेले आहे) हा ११ वर्षांचा मुलगा आपल्या मित्रांसोबत खेळून घरी परतत होता. वाटेत एका मिरवणुकीतील वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यावरील अवजड जनरेटर सेट थेट राहुलच्या अंगावर कोसळला. या भीषण अपघातात राहुल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने नागपूरच्या धंतोली येथील नेल्सन खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात आणले तेव्हा राहुलची अवस्था अत्यंत चिंताजनक होती. त्याला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता. तसेच नाक, कान आणि तोंडातून रक्तस्त्राव होत होता. डॉक्टरांनी त्याला तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवले. मात्र काही वेळातच त्याच्या हृदयाचे ठोके थांबले. तांत्रिकदृष्ट्या तो मृत्यूच्या छायेत होता.

पण याप्रकरणी डॉक्टरांनी धीर सोडला नाही. त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यामुळे राहुलला जीवदान मिळाले. बालरोग तज्ज्ञ डॉ. यश बानाईत आणि त्यांच्या चमूने हार न मानण्याचे ठरवले. राहुलला कोणताही पूर्व आजार नसल्याने डॉक्टरांनी त्याला शेवटपर्यंत वाचवण्याचा निर्धार केला. वैद्यकीय मानकांनुसार २०-३० मिनिटे सीपीआर दिला जातो, परंतु येथे डॉक्टरांनी तब्बल १०० मिनिटांहून अधिक काळ सातत्याने सीपीआर देणे सुरू ठेवले.

अखेर चमत्कार घडला

शर्थीच्या प्रयत्नांनंतर अखेर राहुलच्या हृदयाचे ठोके परत आले. इतका वेळ हृदय बंद राहिल्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने मेंदूचे कायमस्वरूपी नुकसान (Brain Damage) होण्याचा मोठा धोका होता. मात्र, डॉक्टरांचे उपचार आणि मुलाची जगण्याची इच्छाशक्ती यामुळे तो या धोक्यातूनही सुखरूप बाहेर पडला. आता हा चिमुकला पूर्णपणे बरा झाला असून स्वतःच्या पायावर चालत सुखरूप घरी परतला आहे. या यशस्वी उपचारामुळे डॉ. यश बानाईत आणि त्यांच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Follow Us
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?