AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : अजित पवारांच्या अपघाती निधनाच्या मुद्द्यावर आज चर्चा? विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने

| Edited By: | Updated on: Mar 18, 2026 | 9:11 AM
Share

Maharashtra News LIVE Updates : ऐन सनासुदीच्या काळात राज्यात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा फटका देशात दिसत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

Maharashtra News LIVE :  अजित पवारांच्या अपघाती निधनाच्या मुद्द्यावर आज चर्चा? विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने
breaking news

LIVE NEWS & UPDATES

  • 18 Mar 2026 09:47 AM (IST)

    नागपूरच्या आमदार निवास कॅन्टीनमधील गॅस पुरवठा अंशतः सुरळीत

    नागपूर येथील आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निर्माण झालेला गॅसचा गंभीर तुटवडा आता काहीसा कमी झाला आहे. काही प्रमाणात सिलेंडर उपलब्ध झाल्याने दोन ते तीन दिवस पुरेल इतका साठा जमा झाला असून, आज सकाळचा नाश्ता वेळेवर तयार झाला आहे. महाराष्ट्र आणि देशभरातून येणाऱ्या १०० ते १५० पाहुण्यांची जेवण आणि नाश्त्याची सोय यामुळे काहीशी सुखकर झाली असली, तरी अद्याप आवश्यक तेवढा पुरवठा मिळालेला नाही. काल मिळालेल्या सिलेंडरवर सध्याचे काम रेटले जात असून, पूर्ण गरजेनुसार गॅस उपलब्ध नसल्याने प्रशासनाला अजूनही इतर पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे.

  • 18 Mar 2026 09:37 AM (IST)

    गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाचा मोठा निर्णय

    नाशिक शहरातील नागरिकांना गॅस पुरवठा सुरळीत व्हावा आणि वितरणातील अडथळे दूर व्हावेत, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष आता २४ तास खुला ठेवण्यात आला आहे. या कक्षात कर्मचारी विविध शिफ्टमध्ये काम करत असून, अनेक कर्मचारी रात्रपाळी करून गॅस वितरणाबाबत येणाऱ्या अडचणी सोडवत आहेत. गॅस पुरवठ्याशी संबंधित तक्रारी आणि मदतीसाठी नियंत्रण कक्षात सतत फोन येत असून, प्रशासन अत्यंत सक्रियतेने या समस्यांचे निराकरण करत आहे.

  • 18 Mar 2026 09:27 AM (IST)

    संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला प्रकरण, घटनेच्या निषेधार्थ आज रास्तारोको आंदोलन

    संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला असून मुलीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला इजा झाली आहे..जखमी मुलीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितल आहे. आज मुलीच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार असल्याची माहिती देखील रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे. सध्या पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज वडगावपान ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे.

  • 18 Mar 2026 09:17 AM (IST)

    अजित पवारांच्या अपघाती निधनाचा मुद्द्यावर आज चर्चा? विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने

    महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज १७ वा दिवस असून, विधानसभेत आज २९३ च्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा पार पडणार आहे. विशेषतः माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनासंदर्भातील चर्चा अद्याप प्रलंबित असल्याने, आज या संवेदनशील विषयावर सभागृहात खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या प्रस्तावावरही आजच चर्चा होणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष आजच्या कामकाजाकडे लागले आहे.

  • 18 Mar 2026 09:07 AM (IST)

    गोंदियात भीषण अपघात, ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे एक हृदयद्रावक अपघाताची घटना घडली आहे. आपल्या पुतणीला घेण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे दुचाकीने जात असलेल्या काकाचा भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण भीषण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, अपघाताचे दृश्य अंगावर शहारे आणणारे आहे. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत ट्रॅक्टर चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

  • 18 Mar 2026 08:50 AM (IST)

    मेळघाटच्या हत्ती घाट बुरड घाट परिसरात भीषण वनवा

    महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर गेल्या 3 दिवसापासून आगीचा वणवा. प्रचंड धुराची लोट पसरल्याने वनविभागाचे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू. सामाजिक कार्यकर्ते बंड्या साने यांनी सतर्कता दाखवत प्रशासनाचे लक्ष वेधले.. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या परिसरात आग लागल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाची धडपड

  • 18 Mar 2026 08:40 AM (IST)

    जळगावात राष्ट्रीय महामार्गावर आयशरची गव्हाने भरलेल्या ट्रॅक्टरला धडक

    धरणगाव तालुक्यातील मुसळी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. ट्रकच्या धडकेमध्ये ट्रॅक्टर मधील संपूर्ण गहू रस्त्यावर पडून शेतकऱ्याचे मोठे नुकसान. ट्रॅक्टर ट्रॉली बरोबर गहू रस्त्यावर सांडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. धडक एवढी जोरदार होती की ट्रॅक्टरला लागलेली ट्रॉली थेट रस्त्यावर उलटली होती..
  • 18 Mar 2026 08:30 AM (IST)

    व्यवसायिक सिलेंडर अभावी महामार्गावरील हॉटेल पडतायेत बंद 

    आठ दिवसांपासून एकही व्यवसाय सिलेंडर भेटले नाही. आम्हाला कल्पना नव्हती की अचानक अशा टाक्या बंद होतील अन्यथा आम्ही भरून ठेवल्या असत्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या कामगारांना सुट्टी दिली आहे. मात्र इतर कामगारांना अर्धा पगार देऊन त्यांच्या जेवायची व राहण्याची सोय करत आहे. त्यांच्या जेवणासाठी अर्धी टाकी शिल्लक ठेवली आहे. लवकर जर सिलेंडर भेटले नाही तर हेही कामगार निघून जातील
  • 18 Mar 2026 08:20 AM (IST)

    तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज सुनावणी

    मनसेचे शहर उपाध्यक्ष अॅड. नितीन पंडित यांनी यासंदर्भात न्यायालयात दाखल केली आहे याचिका. यापूर्वी नाशिक पालिकेने व राज्य सरकार यांना याचिकाकर्ते यांच्या अंतरिम अर्जावर प्रतिज्ञापत्र सादर नाही. त्यामुळे आज मनपा प्रतिज्ञापत्र सादर करणार का? याकडे पर्यावरणप्रेमींसह नाशिककरांचे लक्ष

  • 18 Mar 2026 08:15 AM (IST)

    धाराशिवच्या लोहारात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतीला मोठा फटका

    गारपिटीमुळे कलिंगडची शेती जमीन दोस्त. लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्या शेतकऱ्याची माहिती. काढणीला आलेले कलिंगड गारपिटीच्या तडाख्यात शेतकऱ्याचं मोठं नुकसान. गारपिटीमुळे कलिंगडाला तडे, मार लागल्याने आत मध्येही कलिंगड डॅमेज जाग्यावरच सडतील

  • 18 Mar 2026 08:11 AM (IST)

    अवकाळी पावसाच्या धास्तीमुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पिकांच्या काढणीला वेग

    :हवामान विभागाकडून जालना जिल्ह्याला येत्या 20 तारखेपर्यंत अवकाळी पावसासह गारपीट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आता रब्बी हंगामातील गहू हरभरा आणि इतर पिकांच्या काढणीला वेग आला असून तशी लगबग पाहायला मिळत आहे.

राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यादरम्यानच काल अनेक भागात मोठी गारपीट झाली. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आजही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा अंदाज अनेक जिल्ह्यांमध्ये वर्तवण्यात आला. यासोबतच काही भागात उष्णता वाढत आहे. काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर होते, यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. इराण अमेरिका युद्धामुळे राज्यासह देशात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे बंद झाल्याने अनेक हॉटेल बंद आहेत. यासोबतच खानावळी चालकांवरही खानावळ बंद ठेवण्याची वेळ आली. मुंबईतील 40 टक्के हॉटेल आज बंद आहेत. एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांचे रोजगार जाण्याची वेळ आली. यासह महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे अपडेटस जाणून घेण्यासाठी दिवसभर टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग फॉलो करा.

Published On - Mar 18,2026 8:09 AM

Follow Us
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत.
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय.
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार.
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी.
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ.
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले...
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले....
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत.
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....