हाताला तेल लावून दाराचा कोयंडा तोडला, 7 तोळे सोन्यासह साडे चार लाख लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Feb 23, 2021 | 11:30 AM

वसईत एका वकिलाच्या घरी (Vasai Robbery Thieves Caught In CCTV) चोरांनी तब्बल साडे चार लाखांची चोरी केली आहे.

हाताला तेल लावून दाराचा कोयंडा तोडला, 7 तोळे सोन्यासह साडे चार लाख लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद
Vasai Robbery
Follow us on

वसई : वसईत घरफोडी, चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. वसईत एका वकिलाच्या घरी (Vasai Robbery Thieves Caught In CCTV) चोरांनी तब्बल साडे चार लाखांची चोरी केली आहे. या चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे (Vasai Robbery Thieves Caught In CCTV).

हाताला तेल लावून दाराची कडी तोडली

या चोरट्यांनी हाताला तेल लावून चक्क दाराच्या कडीमध्ये हात घालून कडी कोयंडा तोडला. त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केला. या चोरट्यांनी घरातील दीड लाख रक्कम रोख आणि 7 तोळे सोने लंपास केलं आहे. सध्या हे चोरटे फरार आहेत.

चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्याआधारे चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

Vasai Robbery

वसई पश्चिमेकडील साई नगर परिसरातील मारिया अपार्टमेंटमध्ये रविवारच्या रात्री ही घटना घडली आहे.
ऍडव्होकेट प्रसाद चिरोडिया यांच्या घरात ही चोरी झाली आहे. दोन चोरट्यांनी हाताला तेल लावून सेफ्टी डोरमध्ये हात घालून लॉक तोडलं आहे (Vasai Robbery Thieves Caught In CCTV).

साडेचार लाखाचा मुद्देमाल लंपास

ऍडव्होकेट प्रसाद चीरोडिया हे कामानिमित्त नाशिक येथे गेल्यामुळे मागील दोन दिवसांपासून घर पूर्णपणे बंद होते. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी रविवारी रात्री आठच्या सुमारास बिल्डिंगमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी घरातील दीड लाख रोख रक्कम आणि सात तोळे सोनं, असा जवळपास साडेचार लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे.

Vasai Robbery Thieves Caught In CCTV

संबंधित बातम्या :

नागपुरात ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटचा भांडाफोड, दोघांना अटक, पावणे सहा लाखांचे ड्रग्ज जप्त

माझ्यावर प्रेम अन् दुसऱ्यांकडे पाहते म्हणून महिलेची हत्या, सापर्डेतील ‘त्या’ खुनाचा उलगडा