Video : नगराध्यक्षाची अधिकाऱ्याला मारहाण! संपूर्ण प्रकार CCTV त कैद; मारहाणीचं कारण नेमकं काय?

| Updated on: Apr 05, 2022 | 8:00 PM

मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेरात कैद झालाय. नगराध्यक्ष विजय औटी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केलीय. मारहाणीचं नेमकं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.

Video : नगराध्यक्षाची अधिकाऱ्याला मारहाण! संपूर्ण प्रकार CCTV त कैद; मारहाणीचं कारण नेमकं काय?
पारनेर नगर पंचायतीत नगराध्यक्षांची अधिकाऱ्याला मारहाण
Image Credit source: TV9
Follow us on

अहमदनगर : पुढाऱ्याची अधिकाऱ्याला मारहाण, शिवीगाळ अशा अनेक बातम्या तुम्ही वाचल्या, पाहिल्या असतील. असाच एक प्रकार अहमदनगरच्या (Ahemadnagar) पारनेरमध्ये घडलाय. पारनेर नगर पंचायतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष विजय औटी (Vijay Auti) यांनी पाणी पुरवठा विभागाच्या (Water Supply Department) अभियंत्याला मारहाण केल्याची घटना घडलीय. राज भोज असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता कार्यालयातच हा संपूर्ण प्रकार घडलाय. मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेरात कैद झालाय. नगराध्यक्ष विजय औटी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केलीय. मारहाणीचं नेमकं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी सविता कुमावत यांनी मध्यस्ती केल्यानं सरकारी कार्यालयातील वाद मिटल्याचं सांगितलं जात आहे.

विजय औटी निलेश लंकेंचे समर्थक

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सांगितलेले काम वेळेत पूर्ण केले नाही म्हणून नगराध्यक्षांचा पारा चढला आणि त्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्याला मारहाण केली. सरकारी कार्यालयात अधिकाऱ्याला मारहाण करणारे विजय औटी हे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहेत. तसंच ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांचे समर्थक आहेत.

पोलिसांकडे अजूनही तक्रार नाही!

विजय औटी यांनी नगरपंचायतीमध्ये येत अधिकाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. कार्यालयापर्यंत सुरु झालेला हा वाद बाहेरपर्यंत आला. त्यावेळी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. सविता कुमावत तिथे आल्या. वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असताना कुमावत यांनाही धक्का लागल्याचं सांगितलं जातं. हा प्रकार नगरपंयातीच्या कार्यालयातील CCTV मध्ये कैद झालाय. मात्र, याबाबत अध्याप पोलिसांकडे तक्रार देण्यात आलेली नाही.

इतर बातम्या : 

Raju Shetty : आधी आमदाराला बाहेरचा रस्ता, आता महाविकास आघाडीला रामराम! स्वाभिमानीत नेमकं काय घडतंय?

‘भ्रष्टाचार नसेल तर घाबरता कशाला, कोर्टात जा’, चंद्रकांतदादांचा राऊतांना टोला, भाषा सुधारण्याचाही सल्ला