देवाला भेटायला जायचंय… नवरा कामावर गेला अन् तिने इमारतीच्या 5व्या मजल्यावरून… तिने असं का केलं?

दराबादच्या हिमायतनगरमध्ये 43 वर्षीय पूजा जैन यांनी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी देवाशी भेटण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. शेजाऱ्यांच्या माहितीनुसार, पूजा गेल्या काही दिवसांपासून धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात गुंतल्या होत्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरू आहे.

देवाला भेटायला जायचंय… नवरा कामावर गेला अन् तिने इमारतीच्या 5व्या मजल्यावरून… तिने असं का केलं?
नवरा कामावर गेला अन् तिने ..
| Updated on: Aug 04, 2025 | 9:15 AM

हैदराबादच्या हिमायतनगर भागात एक अतिशय धक्कादायक आणि हैराण करणारी घटना घडली आहे. तेथे राहणाऱ्या पूजा जैन या 43 वर्षांच्या महिलेने इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे उघड झाले. नेहमीप्रमाणे पूजा यांचे पती कामावर निघून गेले, त्यानंतरच हा प्रकार घडला. यामुळे प्रचंड खळबळ माजली असून पूजाच्या अकस्मात मृत्यून हळहळ व्यक्त होत आहे. पूजा जैन ही गेल्या काही दिवसांपासून अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होती, गुंग होती, असे सांगण्यात येत आहे.

देवाला भेटायला जायचंय… त्या नोटमधून खुलासा

पूजा जैन हिने पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याने तिचाच घटनास्थळीच मृत्यू झाला आणि गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. तेथून त्यांनी एक सुसाईड नोटहील जप्त केली. देवाला भेटण्यासाठी ती स्वतःचे बलिदान देत आहे, असे पूजा जैन हिने त्या नोटमध्ये लिहून ठेवले होते. हे पाऊल मी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने उचलले आहे जेणेकरून मी देवाच्या जवळ जाऊ शकेन, असेही तिन त्या नोटमध्ये नमूद केलं होतं.

शेजाऱ्यांनी काय सांगितलं ?

तेथील जैन यांच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजाला अलीकडेच ध्यान, उपासना आणि धार्मिक ग्रंथांमध्ये रस निर्माण झाला होता. तिला आता सांसारिक जीवनातून मुक्तता हवी आहे आणि तिला देवाच्या चरणी शरण जायचं आहे, आश्रय घ्यायचा आहे असं ती अनेकदा म्हणायची, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान पोलिसांनी पूजा जैनचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सध्या, कोणत्याही कटाचा किंवा मानसिक आजाराचा संशय नाही, परंतु पोलिस प्रत्येक पैलूचा तपास करत आहेत.