Accident news : ट्रॅक्टरच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

| Updated on: Oct 09, 2023 | 4:38 PM

महाराष्ट्रात क्राईमच्या रोज विविध घटना घडत आहेत. ट्रॅ्क्टरच्या धडकेत एका विद्यार्थींचा मृत्यू झाला आहे. ज्यावेळी अपघात झाला होता, त्यावेळी घटनास्थळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

Accident news : ट्रॅक्टरच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू
crime news in marathi (5)
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

महाराष्ट्र : सायकलवरून शाळेत जाताना रिव्हर्स येणाऱ्या ट्रॅक्टरच्या (tractor accident) चाकाखाली येऊन पाचवीत शिकणाऱ्या शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील कामरगावातील काझी प्लॉट येथे घडली आहे. अतेमा फातेमा मुजाईद खान असे मृत्यू झालेल्या 12 वर्षीय विद्यार्थिनीचे नाव आहे. ती सायकलवरून शाळेत जात असताना समोरून रिव्हर्स येणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला मागची विद्यार्थिनी दिसली नसल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन तिचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी (washim crime news) वेळीच घटनास्थळी धाव घेत जमावावर नियंत्रण मिळवले. सध्या गावात तणाव पूर्ण शांतता असून पुढील कारवाई कामरगाव पोलीस (washim kamargaon police) करत आहेत.

रिक्ष्याच्या धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू

नवापूर तालुक्यातील विसरवाडी-नंदुरबार रस्त्या लगत असलेल्या कुंभारवाडा फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ॲपे रिक्षाने एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आपल्या वैयक्तिक कामासाठी रस्त्याने जात असलेल्या विक्रम गावित या ५८ वर्षीय व्यक्तीला बेशिस्त पद्धतीने ऑटो रिक्षा चालकाने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत संबंधित व्यक्तीच्या डोक्याला आणि चेहऱ्याला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या. त्यामुळे या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.

हे सुद्धा वाचा

खड्ड्यात पोहायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू

धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील विजोरा येथे पाण्याच्या टाकी उभारण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात पोहायला गेलेल्या दोन चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पाण्याची टाकी उभारण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहायला गेलेल्या गावातील 8 वर्षीय प्रवीण साळुंके व यश वाघमारे या 2 मुलांचा मृत्यू झाला आहे.