लग्नाच्या आमिषाने सात वर्ष शारीरिक संबंध, दुसऱ्याच मुलीशी लग्न करुन पीडितेवर पुन्हा अत्याचार

सात वर्षे शारीरिक संबंध प्रस्थापित करत तरुणीची फसवणूक केल्याप्रकरणी वाशिममध्ये आरोपीसह पाच जणांवर गुन्हा (Washim Girl Sexual Assault)

लग्नाच्या आमिषाने सात वर्ष शारीरिक संबंध, दुसऱ्याच मुलीशी लग्न करुन पीडितेवर पुन्हा अत्याचार
वाशिममध्ये तरुणीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 12:18 PM

वाशिम : जुन्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर सातत्याने सात वर्षे शारीरिक संबंध प्रस्थापित करत तरुणीची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी शेख मोहसीन शेख या युवकासह अन्य पाच आरोपींवर वाशिम जिल्ह्याच्या रिसोड पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Washim Girl Sexual Assault for 7 years on pretext of marriage)

रिसोड येथील फिर्यादी मीना (बदललेले नाव) माणुसकी नगरची रहिवासी आहे. तिची आणि आरोपीची सात वर्षांपूर्वी रिसोड शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये भेट झाली होती. तेव्हा पीडित तरुणी तिथे आरोग्य सेविकेचे काम करत होती. आरोपीने त्याच्या जवळच्या नातेवाईकाला हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. त्यावेळी दोघांची ओळख झाली.

लग्नाच्या आमिषाने सात वर्ष शारीरिक संबंध

आरोपीने पीडितेचा मोबाईल नंबर घेऊन तिला वारंवार फोन करण्यास सुरुवात केली. माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे सांगत त्यानंतर आरोपीने पीडितेला रिसोड शहरातील विविध ठिकाणी नेले. तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने आक्षेप घेतला असताना लग्नाचे आमिष दाखवून तो शारीरिक अत्याचार करत राहिला.

16 एप्रिल 2021 रोजी पीडितेला कोणत्याही प्रकारची माहिती न देता आरोपीने दुसऱ्याच मुलीसोबत लग्न केले. पीडितेने या संबंधी विचारणा केली असता 27 एप्रिल 2021 रोजी रात्री 12.30 वाजता आरोपी पीडितेच्या घरी गेला. माझ्या घरच्या लोकांना तुझ्यासोबत बोलायचे आहे, असे सांगून तो बाईकवर बसवून तिला घरी घेऊन गेला.

पीडितेला घरी नेऊन अत्याचार

धक्कादायक म्हणजे आरोपीने परत तिच्यावर अत्याचार केले. पीडितेने आरडाओरडा केली असता त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी येऊन “तुझी लायकी आहे का आमच्या घराची सून होण्याची” असं म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली. त्यामुळे जीवाच्या भीतीने तिने 28 एप्रिल 2021 रोजी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात तक्रार दिली.

यानंतर शेख मोहसीन शेख पाशु, शेख पाशु शेख फरीद, सुलताना बी शेख पाशु, इलियाज शेख पाशु, नगमा बी शेख पाशु, उजमा बी शेख पाशु यांच्या विरोधात विविध कलमां अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम 376, 504, 506, 34 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास मुंढे करत आहेत.

संबंधित बातम्या :

22 वर्षीय तरुणीची बर्थडेला हत्या, शारीरिक संबंधावेळी गुदमरुन मृत्यू, मारेकऱ्याचा दावा

भोजपुरी सिनेमातील तरुणींना वेश्या व्यवसायात ढकललं, मीरा रोडमध्ये दोघांना अटक

(Washim Girl Sexual Assault for 7 years on pretext of marriage)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.