
आंध्रप्रदेश : स्नॅपचॅटवरून त्यांची ओळख झाली मग रोजच चॅटींग करू लागले. चॅटींग करणारी मैत्रिणीला त्याला भेटायचे होते. परंतू या स्नॅपचॅटींग करणाऱ्या मेैत्रिणीने तिचे लग्न झाल्याचे त्याच्यापासून लपवून ठेवत त्याला अंधारात ठेवले. त्यामुळे त्याने जेव्हा तिच्याशी रिलेशन बनविण्याची इच्छा प्रदर्शित केली तेव्हा तिने त्याच्याशी बोलणेच बंद केले. त्यामुळे चिडलेल्या युवकाने तिचा बदला घेण्यासाठी तिचे घर गाठले खरे पण भलतेच घडले…
आंध्राच्या नेल्लोर जिल्ह्यातील एका २५ वर्षीय हरिकृष्णा नावाच्या युवकाची एका मुलीशी ऑनलाईन मैत्री झाली. त्यामुळे दोघे रात्रभर तासनतास स्नॅपचॅट वरून ऑनलाईन गप्पा मारू लागले. त्यांची मैत्री दिवसेंदिवस वाढतच गेली. या युवकाने आता या तरूणीला थेट लग्नाची मागणीच घातली. परंतू कोनसीमा जिल्ह्यातील त्या तरूणीचे आधीच लग्न झाले होते. त्यामुळे तिने रिलेशनशिप बनविण्यास सपशेल नकार कळविला. त्यामुळे ही तरूणी त्याच्याशी पूर्वीप्रमाणे चॅटींग करेनाशी झाली. त्यामुळे हरिकृष्णाला आपली फसवणूक झाल्याचे वाटल्याने तो प्रचंड चिडला.
आईचा फोटो दाखविला होता
हरिकृष्णाला या महिलेने चॅटींग करताना आपला पत्ता आणि आईचा फोटो दाखविला होता. त्यामुळे हरिकृष्णा याने आपल्या मैत्रिणीला शोधत तिचा बदला घ्यायचा असा प्लान रचला. त्यामुळे त्याने कोनसीमा जिल्ह्यातील अमलपुरम मधली मैत्रिण रहात असलेली गल्ली आणि घरही शोधून काढले.
घराच्या छतावर मैत्रिणीच्या आईला पाहिले
हरिकृष्णा याने आपल्या मैत्रिणीच्या घराच्या छतावर तिच्या आईला पाहीले आणि ओळखले. त्यावेळी अन्य महिला तिच्या सोबत होती. त्याने तिच्या आईला पाहिले होते. परंतू मैत्रिणीचा चेहरा पाहिला नसल्याने आई सोबतच्या महिलेला आपली मैत्रिण समजून त्याने तिच्या गळ्यावर चाकूने वार केला. हे पाहून मैत्रिणीची आई छतावरून धावत खाली आली तर तिलाही त्याने चाकूने वार करून जखमी केले.
मैत्रीण समजून मोलकरणीला मारले
किंकाळ्यांच्या आवाजाने शेजारी पाजारी धावत आले आणि त्यांनी हरिकृष्णाला पकडून पोलिसांच्या हवाली केले. हरिकृष्णाच्या मैत्रिणीच्या आईला रूग्णालयात दाखल केले. तर ज्या महिलेला त्याने मैत्रिण समजून ठार केले ती त्याच्या घरातील घरकाम करणारी मोलकरीण निघाली. तिचा जागीच मृत्यू झाला.
पाच महिन्यांपूर्वी झाली दोस्ती
हरिकृष्णा याची या महिलेशी पाच महिन्यांपूर्वी स्नॅपचॅटवरून दोस्ती झाली होती. त्यानंतर ते सतत एकमेकांशी फोनवर गप्पा मारीत बसायचे. त्यामुळे नंतर त्याने या महिलेला रिलेशनशिपसाठी दबाव टाकायला सुरूवात केली. ही महिलेचे लग्न झालेले असल्यामुळे तिने त्याच्याशी गप्पा मारणे हळूहळू बंद केले. यामुळे हरिकृष्णा याचे डोके फिरले. आणि त्याच्या मनात तिच्याविषयी राग निर्माण झाल्याचे पोलिसांनी सांगितले.