मुलीच्या मृत्यूने माहेरच्या मंडळींचा संताप, जावयाची चपलेने धुलाई, रुग्णालयाबाहेरच गोंधळ

| Updated on: May 10, 2022 | 3:40 PM

पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यात नंदई रेल्वे लाईनजवळ सोमवारी शर्मिला रुईदास नावाच्या महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर मृत महिलेचे संतप्त नातेवाईक हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि सासरच्या मंडळींवर खुनाचा आरोप करु लागले.

मुलीच्या मृत्यूने माहेरच्या मंडळींचा संताप, जावयाची चपलेने धुलाई, रुग्णालयाबाहेरच गोंधळ
पश्चिम बंगालमध्ये महिलेच्या सासरच्यांना माहेरच्या मंडळींची मारहाण
Image Credit source: सोशल
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगालमधील (West Bengal Crime News) पूर्व वर्धमान जिल्ह्यातील रुग्णालयाच्या शवागारात मयत महिलेच्या संतप्त कुटुंबीयांनी गोंधळ घातला. विवाहितेच्या नवऱ्यासह तिच्या सासरच्या मंडळींना बेदम मारहाणही (Husband Beaten up) करण्यात आली. महिलेच्या आई-वडिलांनी तिच्या पतीला तर चक्क चपलेचा प्रसाद दिला. वर्धमान जिल्ह्यातील कालना परिसरात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. रेल्वे रुळांजवळ विवाहितेचा मृतदेह आढळला होता. मात्र आपल्या मुलीचा मृत्यू अपघाती नसून सासरच्या माणसांनी आपल्या मुलीची हत्या (Murder) केली, असा आरोप तिच्या माहेरच्या मंडळींनी केला. मारहाणीच्या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

काय आहे प्रकरण?

पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यात नंदई रेल्वे लाईनजवळ सोमवारी शर्मिला रुईदास नावाच्या महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर मृत महिलेचे संतप्त नातेवाईक हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि सासरच्या मंडळींवर खुनाचा आरोप करु लागले. शर्मिलाचे सासरचे लोक तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचा दावा तिच्या माहेरच्या मंडळींनी केला. नातेवाईकांचा आरोप आहे की, मृत शर्मिला रुईदासचा पती बनेश्वर दास हा अनेकदा दारू पिऊन घरी यायचा आणि पत्नीला मारहाण करायचा.

माहेरच्या माणसांकडून नवऱ्याला मारहाण

मृत महिलेच्या कुटुंबीयांना एवढा संताप अनावर झाला होता, की त्यांनी तिच्या पतीला शवागारातून बाहेर गाडीत नेऊन बेदम मारहाण केली. त्यांनी महिलेच्या सासरच्या मंडळींनाही चपलेने मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

मारहाणीच्या प्रकारानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. यावेळी उपस्थित पोलिसांनी मोठ्या कष्टाने परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या महिलेच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा आहे.