AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : किती कमावला तरी पैसा हातात टिकत नाही? मग घरात या पक्ष्याचा फोटो लावाच, वास्तुशास्त्र काय सांगतं?

वास्तुशास्त्रामध्ये ज्या प्रमाणे काही झाडं ही शुभ माण्यात आली आहेत, त्याचप्रमाणे काही प्राणी आणि पक्षी देखील शुभ माण्यात आले आहेत, आज आपण अशा एका पक्ष्याबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याचा फोटो जर घरता लावला तर घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, असं मानलं जातं.

Vastu Shastra : किती कमावला तरी पैसा हातात टिकत नाही? मग घरात या पक्ष्याचा फोटो लावाच, वास्तुशास्त्र काय सांगतं?
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 21, 2026 | 9:01 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी? याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाही, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात, दैनंदिन जीवनात ज्या समस्या भेडसावतात त्या समस्या दूर करण्यासाठी देखील उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रामध्ये काही झाडांना अत्यंत शुभ मान्यात आलं आहे, ही झाडं जर तुमच्या घरात असतील तर तुमच्या घरावर लक्ष्मी मातेची कृपा होते, घराला आर्थिक स्थैर्य लाभते आणि पैसा हातात टिकतो, जर कर्ज असेल तर कर्जातून देखील लवकर सुटका होते, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. ज्या प्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये काही झाडं ही शुभ माण्यात आली आहेत, त्याचप्रमाणे काही पक्षी देखील वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार कितीही पैसा कमावला आणि तो जर तुमच्या हातात टिकत नसेल तर अशा स्थितीमध्ये या पक्ष्याचं छायाचित्र तुमच्या हॉलमध्ये लावणं हे अत्यंत शुभ आहे, यामुळे घराला तर आर्थिक स्थैर्य मिळतेच परंतु कर्जातून देखील तुमची लवकर सुटका होते, चला तर मग जाणून घेऊयात या पक्ष्याबद्दल.

निळकंठ पक्षी – निळकंठ पक्षाला वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मान्यात आलं आहे. निळकंठ पक्ष्याचं दर्शन झाल्यास हे खूप शुभ संकेत असतात. जर पैसा तुमच्या हातात टिकत नसेल आणि तुम्ही कर्जबाजारी झाला असाल तर अशा स्थितीमध्ये निळकंठ पक्ष्याचा फोटो हा तुमच्या हॉलमध्ये लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे, यामुळे हळुहळु तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होते, आणि कर्जातून देखील तुम्हाला लवकर मुक्ती मिळते असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. एवढंच नाही तर वास्तुशास्त्रामध्ये मोरांच्या पंखांना देखील अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. आर्थिक फायद्यासाठी, नोकरीत किंवा व्यवसायामध्ये यश मिळण्यासाठी मोराचा किंवा मोराच्या पंखाचा फोटो घरात लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

दुसरीकडे जर पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होत असतील तर त्यासाठी देखील वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. बेडरूममध्ये लव्ह बर्डचा फोटो ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे, या फोटोमुळे नात्यातील तणाव दूर होतो, आणि विनाकारण भांडणं होत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...