भयंकर! दुसरीही मुलगी झाल्याचा राग, नवऱ्यानेच बायकोच्या गुप्तांगात लोखंडी रॉड खुपसला

पश्चिम बंगालच्या पूर्व वर्धमानमध्ये एका महिलेसोबत घरगुती हिंसाचाराची अंगावर काटे आणणारी घटना समोर आली आहे. मुलगा न झाल्यामुळे पतीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घुसवल्याचा आरोप आहे. महिलेला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत

भयंकर! दुसरीही मुलगी झाल्याचा राग, नवऱ्यानेच बायकोच्या गुप्तांगात लोखंडी रॉड खुपसला
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 10:23 AM

कोलकाता : आपल्या देशातील काही भागात ‘मुलगी झाली हो’ म्हणत आनंदोत्सव साजरा होत असल्याचं पाहायला मिळतं, त्याच वेळी दुसरीकडे मुलाच्या जन्मासाठी बायको-सुनेसोबत अघोरी प्रकार करणारे नराधमही दिसतात. मुलाला जन्म न दिल्यामुळे नवऱ्याने बायकोच्या गुप्तांगात रॉड घातल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. पश्चिम बंगालमधील (West Bengal) वर्धमान पूर्व भागात ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पीडित विवाहितेला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्राथमिक तपासाला सुरुवात केल्यानंतर आरोपी पतीला बेड्या ठोकण्यात आल्या. दुसऱ्यांदाही मुलगीच झाल्यामुळे महिलेचा सासरी छळ केला जात होता. अखेर पत्नीच्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये लोखंडी रॉड खुपसून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

पश्चिम बंगालच्या पूर्व वर्धमानमध्ये एका महिलेसोबत घरगुती हिंसाचाराची अंगावर काटे आणणारी घटना समोर आली आहे. मुलगा न झाल्यामुळे पतीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घुसवल्याचा आरोप आहे. महिलेला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. त्याचवेळी पोलिसांनी आरोपी पती तौफीक शेख याला अटक करून रविवारी कालना उपविभागीय न्यायालयात हजर केले. आरोपी पतीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 498ए/307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीचा आरोप काय?

माणुसकीला लाजवणारी ही घटना पूर्व वर्धमानमधील कालना पोलीस स्टेशन हद्दीतील बागनापारा येथील बिजारा भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलेला आधी दोन्ही मुलीच आहेत. दुसरी मुलगी झाल्यापासून तिचा छळ केला जात होता. पती गुप्तांगात लोखंडी रॉड घालून अत्याचार करत असे, असा आरोप पीडितेने केला आहे. पतीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तिने केला आहे.

सहा वर्षांपूर्वी विवाह

कालना निवुजी कंपनीडांगा परिसरात राहणाऱ्या शरीफा बिबीचा विवाह 2016 मध्ये बागनापारा बिजारा भागातील तौफीक शेख याच्याशी झाला होता. पहिल्या मुलीच्या जन्मानंतरही सगळं काही सुरळीत होतं, मात्र दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर तिचा छळ सुरू झाला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिचा पती तौफीक शेख अनेक महिन्यांपासून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. आपल्याला घटस्फोट देऊन दुसऱ्या महिलेशी लग्न करेन, जिच्यापासून मला मुलगा होईल, असंही पतीने धमकावल्याचा आरोप तिने केला.

विवाहिता रुग्णालयात

गुप्तांगात रॉड घुसवल्याचा प्रकार घडल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी शनिवारी तिचे सासरचे घर गाठले आणि तिला कालना उपविभागीय रुग्णालयात दाखल केले. पीडितेचे वडील भुलू शेख यांनी सांगितले की, आपल्या मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तिला सासरच्या घरातून कसेबसे सोडवले आणि रुग्णालयात दाखल केले. यानंतर या प्रकरणाची कालना पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

दुसरीकडे, पीडितेची सासू रेणुका शेख हिने सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. तिने सांगितले की, आपल्या मुलाने एकदा सुनेला मारहाण केली होती, मात्र यापेक्षा जास्त काही केले नाही. सूनच (पीडित) काम करत नसल्याचा आरोप सासूने केला.

संबंधित बातम्या :

पतीच्या बर्थडेनिमित्त हॉटेलात जेवायला, पुण्यात विवाहितेवर पाच जणांचा गँगरेप

प्रियकराने प्रेयसीला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या; तिची मात्र पोलिसांत तक्रार, नेमकं प्रकरण काय?

नांदेडमधील अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार, आरोपी अटक

Non Stop LIVE Update
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.