नोकराच्या प्रेमात करोडपती नवऱ्याला संपवलं! सोनम रघुवंशीचा बॉयफ्रेंड राज कुशवाहची सॅलरी ऐकून बसेल धक्का
सोनम रघुवंशीने बॉयफ्रेंड राज कुशवाहासाठी पतीची हत्या केली. आता तिचा बॉयफ्रेंड राज काम काय करतो? किती कमाई करतो? असा प्रश्न सर्वांना पडत आहे.

राजा रघुवंशी खून प्रकरणाने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. एक पत्नी, सोनम रघुवंशी, जी आलिशान आयुष्य जगत होती. एक पती, ज्याची कमाई लाखोंमध्ये होती. आणि एक कथित प्रियकर, जो फक्त वडिलांचा नोकर, माफक कमाई करणारा. त्या कथित प्रियकरासाठी एक भयंकर कट रचला गेला. या कटाचा बळी ठरला स्वतः सोनमचा पती, राजा रघुवंशी.
प्रियकर राजसोबत तासन्तास बोलायची सोनम
इंदौरमधील या प्रकरणात आता जे खुलासे होत आहेत, ते थरकाप उडवणारे आहेत. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. आणि जे रहस्य समोर आले आहे, ते आश्चर्यकारक आहे. मेघालय पोलिसांचा आरोप आहे की, सोनमने स्वतः आपल्या पती राजाला मारण्याचा कट रचला. या कटात तिच्यासोबत होता तिचा कथित प्रियकर राज कुशवाहा, ज्याच्याशी ती तासन्तास बोलायची.
राज कुशवाहाशी सोनमची भेट कशी झाली?
अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येतो की, हा राज कुशवाहा कोण आहे? सोनमची त्याच्याशी भेट कशी झाली? आणि आणखी एक प्रश्न, १५-२० हजार रुपये महिना कमावणाऱ्या राजामध्ये असं काय होतं की सोनम त्याच्यासाठी सर्वकाही पणाला लावायला तयार झाली? खरंतर, सोनमच्या वडिलांचा प्लायवुडचा व्यवसाय आहे. राज त्यांच्याकडेच काम करायचा. तिथेच सोनमची त्याच्याशी ओळख झाली आणि हळूहळू ती जवळीक प्रेमात बदलली.
सोनमचा प्रियकर किती कमावतो?
राजचा पगार किती असेल? कदाचित १५ ते २० हजार रुपये. वर्षभराची कमाई दोन लाखांपेक्षा जास्त नाही. ना मोठं घर, ना कोणती व्यावसायिक पार्श्वभूमी. तरीही सोनमने त्याच्यावर प्रेम केलं आणि या प्रेमाची किंमत तिच्या पतीला, राजा रघुवंशीला, आपला जीव देऊन चुकवावी लागली.
प्रियकरासह मिळून पतीची हत्या
राजा रघुवंशी एक यशस्वी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक होता. इंदौरमध्ये त्याचं स्वतःचं घर होतं आणि व्यवसाय लाखोंमध्ये चालायचा. लग्नही थाटामाटात झालं. पण असा आरोप आहे की, लग्नाच्या फक्त ६ दिवसांनंतरच सोनमने पतीला रस्त्यातून हटवण्याचा कट रचला. असाही आरोप आहे की, हनिमूनच्या बहाण्याने ती राजाला मेघालयला घेऊन गेली. जिथे आधीच तिच्या कथित प्रियकराचे तीन साथीदार उपस्थित होते. असा आरोप आहे की, हे तिघे कॉन्ट्रॅक्ट किलर होते, ज्यांना सोनमने राजसोबत मिळून भाड्याने घेतलं होतं. शिलाँगच्या निसर्गरम्य खोऱ्यांमध्ये, जिथे प्रेमकथा गुंजतात, तिथे एक भयंकर कट रचला गेला. राजाला मारण्यात आलं. त्याच्या डोक्यावर वार करण्यात आले आणि मृतदेह फेकून देण्यात आला. आणि मग सोनमने स्वतःचं अपहरण झाल्याचं खोटं नाटक रचलं.
प्रेमासाठी पतीची हत्या की आणखी काही?
पोलिसांच्या चौकशीत आता अशा कथा समोर येत आहेत ज्या एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्टसारख्या वाटतात. राज कुशवाहा आता पोलिसांच्या ताब्यात आहे आणि सोनमही सापडली आहे. पण सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. खरंच हे सर्व फक्त प्रेमासाठी केलं गेलं? की या प्रेमामागे आणखी काही रहस्य आहे? ही फक्त एका मुलीची बेवफाई आहे? की पडद्यामागे आणखी काही खेळ खेळला गेला? प्रकरणाचा तपास सुरू आहे.
