
पती-पत्नीचे नाते हे पवित्र असते. हे नाते प्रेम, आदर आणि विश्वासाचे मिश्रण आहे. मात्र बऱ्याचदा या नात्यात परस्पर कलह आणि संघर्ष होतो. परंतू यातून मार्ग काढणे महत्वाचे आहे. मात्र कधीकधी असा वाद विकोपाला पोहोचतो आणि त्याचे परिणाम भयानक बनतात. झारखंडच्या लोहारदगा जिल्ह्यातून असीच एक घटना समोर आली आहे, ज्यात पत्नीने कठोर पाऊल उचलले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, घरगुती वादातून पतीने आपल्या पत्नीला एक चापट मारली. मात्र यामुळे पत्नी इतकी संतापली की तिने पतीच्या प्रायव्हेट पार्टवर धारदार शस्त्राने वार केला आणि तो कापला. यामुळे पती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच अनेकांना धक्का बसला आहे.
सदर घटना ही घटना झारखंडच्या लोहारदगा जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशन परिसरातील जुरिया गावात घटली आहे. रविवारी सायंकाळी पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला होता. वादानंतर पतीने रागाच्या भरात पत्नीला चापट मारली. त्यामुळे पत्नी संतापली व तिने घरात ठेवलेले धारदार शस्त्र उचलले आणि पतीच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला करून तो कापला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शुल्लक कारणामुळे ही घटना घडल्याने अनेकानी हळहळ व्यक्त केली आहे.
या घटनेनंतर स्थानिक लोकांनी गंभीर जखमी अवस्थेत पतीला उपचारासाठी लोहारदगा येखील रुग्णालयात दाखल केले आहे. या व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे डॉक्टर त्याला रांची येथील रिम्स रुग्णालयात हलवण्याची तयारी करत आहेत. दरम्यान, या घटनेबाबत आतापर्यंत या पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
याआधी झारखंडच्या पाकुर जिल्ह्यातील हिरणपूर पोलिस स्टेशन परिसरातही अशीच घटना घडली होती. धरनीपहार गावातील कमली पहाडिन नावाच्या महिलेने घरगुती वादातून रागाच्या भरात पती लोफडा पहाडिया यांच्या गुप्तांगावर, डोक्यावर विटांनी हल्ला करत त्याची हत्या केली होती. त्यानंतर कमली पहाडिनला पतीची हत्या केल्यामुळे अटक करण्यात आली आहे.