
एक पती आपल्या पत्नीला डिनरसाठी एका रिजॉर्टमध्ये घेऊन जातो. डिनरच्या आधी दोघेही डान्स करतात. नवरा मोठ्या हौशेने डान्स करतानाचा व्हिडीओही तयार करतो. विशेष म्हणजे हा डान्सचा व्हिडीओ तो आपल्या मोबाईल स्टेट्सलाही ठेवतो. आणि… आणि त्यानंतर काही तासाने त्याच्या बायकोची अचानक हत्या होते. पत्नी वियोगामुळे दु:खी झालेला नवरा हमसून हमसून रडतो. त्याला इतकं दु:खं होतं की तो पत्नीच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी धरणे धरतो. पण जेव्हा आरोपीचा चेहरा उघड होतो, आरोपीची ओळख पटते, तेव्हा देशभरातील लोकांच्या पायाखालची वाळूच सरकते. असं होऊच कसं शकतं? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. एका रुग्णालयाच्या बाहेर काही लोक धरणे धरत होती. त्यात त्या महिलेचा नवराही आहे. त्यानेच आपल्या पत्नीसोबत रिजॉर्टमध्ये सुखाचे काही क्षण घालवले होते. आता त्याची पत्नी या जगात नाही. त्यामुळे बायकोच्या मारेकऱ्याला पकडावं यासाठी तो धरणे धरत होता. 15 तासापूर्वीच त्याच्या बायकोचा खून झाला होता. या व्यक्तीचं...