Jharkhand Murder : पती-पत्नीमध्ये जीन्स परिधान करण्यावरुन वाद, संतापलेल्या बायकोने चाकूने भोसकले, नवऱ्याचा मृत्यू

मुलगा आणि सुनेमध्ये जीन्सवरून वाद झाला होता. या वादातून सुनेने चाकूने वार करून त्याचा खून केला, असे मृतकाचे वडील कर्णेश्वर तुडू यांनी पोलिसांना सांगितले. आरोपी पत्नीनेही आपला गुन्हा मान्य केला आहे.

Jharkhand Murder : पती-पत्नीमध्ये जीन्स परिधान करण्यावरुन वाद, संतापलेल्या बायकोने चाकूने भोसकले, नवऱ्याचा मृत्यू
दौंडमध्ये अज्ञात कारणावरुन व्यक्तीची हत्या
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 17, 2022 | 8:32 PM

झारखंड : पतीने जीन्स घालण्यास मनाई केल्याने संतापलेल्या पत्नी (Wife)ने चाकूने भोसकून पती (Husband)ची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना झारखंडमधील जामतारा येथे घडली आहे. यात पती गंभीर जखमी झाला. त्याला कुटुंबीयांनी तात्काळ उपचारासठी धनबाद येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी धनबाद पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. आंदोलन टुडू असे मयत पतीचे नाव आहे तर पुष्पा हेंब्रम असे हत्या करणाऱ्या पत्नीचे नाव आहे. ही घटना जामतारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोडभिटा गावातील आहे.

दोन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

आंदोलन टुडु आणि पुष्पा हेंब्रम यांचा दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. काल रात्री पुष्पा हेम्ब्रोम जीन्स परिधान करून गोपाळपूर गावात जत्रा पाहण्यासाठी गेली होती. जत्रेहून परत आल्यावर तिच्या पतीने आक्षेप घेत जीन्स घालून जत्रा पाहायला जाऊ नको, असे सांगितले. याचाच राग आल्याने संतापलेल्या पुष्पाने पती आंदोलनवर चाकूने वार केले. यात आंदोलन तुडू गंभीर जखमी झाला. कुटुंबीयांनी जखमी अवस्थेत धनबाद येथील रुग्णालयात नेले, तेथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पत्नीकडून गुन्ह्याची कबुली

मुलगा आणि सुनेमध्ये जीन्सवरून वाद झाला होता. या वादातून सुनेने चाकूने वार करून त्याचा खून केला, असे मृतकाचे वडील कर्णेश्वर तुडू यांनी पोलिसांना सांगितले. आरोपी पत्नीनेही आपला गुन्हा मान्य केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. जामतारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अब्दुल रहमान यांनी सांगितले की, घटनेची नोंद करण्यात आली आहे. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संबंधित घटनेचा एफआयआर धनबादमध्ये नोंदवण्यात आला आहे. (Wife stabs husband to death over jeans dispute in Jharkhand)