AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिप्पट पैसे करतो म्हणत मध्यस्थीच्या मदतीने मांत्रिकाने घातला लाखोंचा गंडा, बीडमध्ये एकाला अटक

एक लाखाचे तीन लाख करतो, असे म्हणत मध्यस्थीच्या मदतीने तरुणांना लाखो रुपयांचा गंडा झाल्याचे प्रकरण बीडमध्ये उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे.

तिप्पट पैसे करतो म्हणत मध्यस्थीच्या मदतीने मांत्रिकाने घातला लाखोंचा गंडा, बीडमध्ये एकाला अटक
फरार आरोपी नगरसेवक संजय तेलनाडे अडीच वर्षांनी गजाआड
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 6:57 PM
Share

बीडः शिरूर तालुक्यात एका मांत्रिकाने मध्यस्थीच्या मदतीने काही तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. एक लाखाचे तीन लाख रुपये करतो, असे अमिष या तरुणांना व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आले. मात्रिकाने सांगितल्याप्रमाणे तरुणांनी  (Youngs Cheated) सर्व कृती केली, मात्र तरुणांच्या हाती सोपवण्यात आलेल्या सॅकमध्ये अखेर खेळण्यातल्या नोटा सापडल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तरुणांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी (Beed Police) एकाला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

रायमोहा येथील तरुण असीम ऊर्फ बाबर पठाण यांच्या मोबाइलवर त्याचे चुलते मकसूद नसीर शेख यांनी एक व्हिडिओ पाठवला होता. त्या व्हिडिओत एक मांत्रिक मंत्रांच्या सहाय्याने तिप्पट पैसे करून देत असल्याचे दिसून येत होते. हा व्हिडिओ पाहून असीमचे चुलते मकसूद यांना हे खरे आहे का, असे विचारले. तेव्हा त्यांनीही नगरमधून हा व्हिडिओ आला असून त्यांना विचारून सांगतो, असे म्हटले. मकसूद यांनी काझी सदगरकडे व्हिडिओ सत्यतेबाबत विचारणा केली. तेव्हा काझीने हा व्हिडिओ खरा असून लोहा येथील त्या मांत्रिकाला भेटल्याचे सांगितले. त्यानंतर काझी सदगरचा नंबर मकसूद यांनी असीम पठाणला सोशल मीडियावरून पाठवला. त्यानंतर काझीने असीम आणि संबंधित मांत्रिकाचे कॉन्फरन्स कॉलवर बोलणेही करून दिले. मांत्रिकाने फोनवर पैसे तिप्पट होतात, असे सांगितले. असिमने त्याच्या मित्रांनाही याबाबत सांगितले. तीन मित्रांनी या मांत्रिकाकडून जास्त पैसे मिळवण्यासाठी साडे तीन लाख गोळा केले.

अंबाजोगाईतून एक हॉटेलवर पैसे घेऊन बोलावले

असीम आणि त्याच्या मित्रांना मांत्रिकाने आधी अंबाजोगाई आणि नंतर अहमदपूर येथून सात किमी अंतरावरील एका हॉटेलमध्ये बोलावले. तेथे पोहोचल्यावर एक त्यांनी सांगितल्याप्रमाणे एका मुलाजवळ साडे तीन लाख रुपये दिले. त्यानंतर मुलाने त्यांच्या हाती पैशांची सॅक दिली. मात्र इथेच सॅक उघडू नका, असे सांगण्यात आले. काही वेळाने सॅक उघडून पाहिली असता त्यात खेळण्यातील नोटा आढळून आल्या.

शेवगावमध्ये एकाला अटक

रायमोहा येथील तरुण असिम पठाण याने शिरूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी पहाटे एक वाजता काझी समीर सदगर यांच्यासह पाटील नावाच्या मांत्रिकावर गुन्हा दाखल केला. शिरूर पोलिसांनी या प्रकरणी शेवगावला काझी सदगर याला अटक केली.

इतर बातम्या-

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सायकल वारी, प्रशासनाच्या दरबारी, तरुण शेतकऱ्याची राज्यभर भ्रमंती

बबनराव लोणीकरांची जीभ घसरली, टोपेंना म्हणाले हरामखोर, जालन्यात गुन्हा दाखल!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.