Ahmednagar Crime : ‘तू खूप छान दिसते, माझ्याशी मैत्री कर’ म्हणाला, मग रुमवर बोलावून पोलीस निरीक्षकाकडूनच महिलेवर अत्याचार

| Updated on: Jul 19, 2023 | 3:53 PM

अहमदनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जनतेचे रक्षक महिलांच्या अब्रूचे भक्षक बनले आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Ahmednagar Crime : तू खूप छान दिसते, माझ्याशी मैत्री कर म्हणाला, मग रुमवर बोलावून पोलीस निरीक्षकाकडूनच महिलेवर अत्याचार
नगरमध्ये पोलीस निरीक्षकाकडून महिलेवर अत्याचार
Image Credit source: TV9
Follow us on

अहमदनगर / 19 जुलै 2023 : नगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जनतेचे रक्षक असलेल्या पोलिसाने एका महिलेची अब्रू लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन राहुरी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ‘तू खूप छान दिसते, माझ्याशी मैत्री कर’ असा व्हॉट्स अपवर संदेश पाठवत पोलिस निरिक्षकाने फिर्यादी महीलेवर रुमवर बोलवून अत्याचार केला. आज याप्रकरणी राहुरीचे आ.प्राजक्त तनपुरे ‌यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. दोन महिने पिडीत महिलेची फिर्याद पोलीस निरिक्षकांनी घेतली नव्हती. त्यामुळे राज्य सरकारने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यास उत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ माहिती घेऊन अत्याचार घडला असेल तर बडतर्फीची कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

काय आहे प्रकरण?

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, जमिन व्यवहारात फसवणूक झाल्याबद्दल ती देवळाली प्रवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यासाठी गेली होती. तेथे तिला एक अनोळखी इसम भेटला. त्याने तिला एक नंबर देत हे राहुली पोलीस ठाण्याचे साहेब असून, तुम्ही करा तुमची तक्रार घेतील असे सांगितले. त्यानुसार महिलेने फोन केला असता त्यांनी दोन दिवसांनंतर पोलीस स्टेशनला येऊन भेटण्यास सांगितले.

त्यानुसार महिला 7 जून रोजी राहुरी पोलीस स्टेशनला गेली. तेथील राहुरी पोलीस स्टेशनचे साहेब रिटायर झाले असल्याने तिने नाऱ्हेडा यांच्या केबिनमध्ये तक्रार सांगण्यासाठी गेली. त्यांनी महिलेची सर्व हकिगत सांगितल्यानंतर त्यांनी तुम्हाला मिस्टर नाहीत का? तुम्ही एकटाच आलेल्या आहेत का? तुमच्या सोबत कोणी नाही आले का? कास्ट कुटली आहे? असे प्रश्न विचारले. यानंतर तिचे काम केल्यास आपल्याला काय मिळेल याची थेट विचारणा केली. महिलेने काही पैसे देऊ केले. मात्र नाऱ्हेडा याने पैशाऐवजी वेगळं काही पाहिजे असे सांगितले.

हे सुद्धा वाचा

यानंतर आठ दिवसांनी महिला तक्रारीबाबत काय झाले विचारण्यास गेली असता आरोपीने महिलेला ‘छान दिसते’ असा मॅसेज केला. यानंतर महिला पोलीस ठाण्यातून घरी गेल्यानंतर पुन्हा ‘माझ्याशी मैत्री करशील का’ असा मॅसेज केला. महिलेने काहीच रिप्लाय न दिल्याने त्याने ‘जानू प्लीज रिप्लाय दे’ असा मॅसेज केला. त्यानंतर व्हॉट्सअपवर व्हाईस कॉल करून भेटण्याची मागणी केली. मात्र महिलेने नकार देत नऱ्हेडा विरोधात एसपींकडे तक्रार दिली. तक्रार दिल्याबाबत नऱ्हेडा याने जाब विचारत माझ्याकडे आली नाहीस, तर घरी मुलासमोर तुझ्यासोबत काही पण करेन अशी धमकी दिली.

यानंतर 17 जुलै रोजी महिलेला रस्त्यात गाठून पुन्हा महिलेला धमकावत आपल्या रुमवर घेऊन गेला. रुमवर नेत महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. सदर महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.