प्रियकरासोबत अश्लील कृत्य सुरु असताना बघितलं, दोघांनी लेकाला ठेचलं, एका आईचं विकृत कृत्य

आईविषयी कितीही लिहिलं तरी अपूर्ण राहील. पण मध्यप्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यात मायलेकाच्याच नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

प्रियकरासोबत अश्लील कृत्य सुरु असताना बघितलं, दोघांनी लेकाला ठेचलं, एका आईचं विकृत कृत्य
सांकेतिक फोटो

भोपाळ : आपल्या आयुष्यात आईचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. खरंतर आई आहे म्हणून आपण आहोत, असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. आपल्या प्रत्येक यशामध्ये आईचा मौल्यवान हात असतो. प्रत्येक संकटात तिचीच साथ असते. आईविषयी कितीही लिहिलं तरी अपूर्ण राहील. पण मध्यप्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यात मायलेकाच्याच नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ही घटना समजल्यानंतर संबंधित महिलेला तुम्ही माता नाही तर वैरीणच म्हणाल. इतक्या खालच्या पातळीवरचं कृत्य महिलेने केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

मध्यप्रदेशच्या डिंडोरी जिल्ह्यात मायलेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आईचे प्रियकरासोबत अश्लील कृत्य सुरु असताना तिथे मुलगा दाखल होतो. याच गोष्टीचा राग मनात धरुन आईने आपल्या प्रियकरासोबत मिळून पोटच्या मुलाची हत्या केली. संबंधित घटना उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घाईघाईत मुलाचा मृतदेह दफन

ही घटना समनापूर पोलीस ठाणे क्षेत्रातील एका गावात घडली आहे. मुलाची प्रकृती बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला, असा दावा कुटुंबियांनी केला होता. त्यानंतर त्यांनी घाईघाईत मुलाचा मृतदेह दफन केला होता. पण मुलाच्या एका नातेवाईकाने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्या आईचे विकृत आणि किळसवाणं कृत्य उघड झालं आहे.

प्रकरण अखेर पोलिसांकडे

मृतक अल्पवयीन मुलाचं नाव सोनू असं होतं. त्याची 2 ऑगस्टला हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तातडीने त्याच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आली होती. पण पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. विशेष म्हणजे पोलिसांनी कोर्टाची अनुमती घेऊन दफन केलेला मृतदेह जमिनीतून बाहेर काढला. त्यानंतर त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यातून मुलाच्या डोक्याला जखम असल्याचं निषपण्ण झालं. मुलाच्या डोक्यावर कुणीतरी हल्ला केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली.

पोलिसांनी आरोपींना पकडलं

पोलिसांना खात्रीलायक सूत्रांकडून मृतक मुलाच्या आईच्या प्रेम प्रकरणाविषयी माहिती मिळाली होती. पोलिसांनी कडक कारवाई करत मृतक मुलाची आई आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी आईने आणि तिचा प्रियकर असलेल्या लालसिंहने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरोधात कलम 302 आणि 201 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

जमीन माझ्या नावावर का केली नाही?, जावयाकडून दोन सासवांची निर्घृण हत्या, महिनाभरानंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या

6 जणांकडून बॅट आणि काठ्यांनी जबर हल्ला, बॅनर लावण्याच्या कारणावरुन हत्येचा थरार

Published On - 3:42 pm, Fri, 13 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI