AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुला माझ्यासोबत झोपावं लागेल, तू मुस्लिम आहेस आणि मी…’ बलात्कार पीडितेकडे पोलिसाची धक्कादायक मागणी

एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. गुन्हा घडल्यानंतर आपण न्याय मागायला पोलिसांकडे जातो. पण तेच पोलीस परिस्थितीचा फायदा उचलत असतील तर? अशावेळी काय करायचं?.

'तुला माझ्यासोबत झोपावं लागेल, तू मुस्लिम आहेस आणि मी...' बलात्कार पीडितेकडे पोलिसाची धक्कादायक मागणी
Police (Representative image)Image Credit source: Representative image
| Updated on: Mar 20, 2026 | 12:52 PM
Share

एका पोलीस शिपायावर रेप पीडितेने गंभीर आरोप केले आहेत. तक्रार मिळाल्यानंतर क्वार्सी पोलीस ठाण्याच्या नगला पटवारी चौकीत तैनात असलेला मुख्य आरक्षी इमरान खान विरुद्ध कारवाई करण्यात आलीय. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु आहे. इमरान मदतीच्या नावाखाली माझ्याशी अश्लील बोलला व संबंध बनवण्यासाठी मला हॉटेलवर यायला सांगितलं असा पीडित महिलेने आरोप केलाय. एसएसपीने ही तक्रार मिळाल्यानंतर इमरानला निलंबित केलय. त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. उत्तर प्रदेशच्या अलीगढमधील हे प्रकरण आहे. अलीगढच्या क्वार्सी पोलीस स्टेशनमधील शिपायाने मदतीच्या बदल्यात पीडितेकडे शारीरिक संबंधांची मागणी केल्याचं लाजिरवाणं प्रकरण समोर आलय. जीशान नावाच्या युवकाने लग्नाचा खोटं आश्वासन देऊन अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने मुख्यमंत्री पोर्टलवर केली होती. तिने एसएसपीकडे केलेल्या तक्रारीत हे म्हटलं आहे.

पीडितेच्या तक्रारीची चौकशी करताना नगला पटवारी चौकीचा दीवाण इमरान खानने पीडितेला बोलावलं. इमरानवर पीडितेला व्हॉट्स अप कॉल करुन प्रायवेट फोटो पाठवायला सांगितल्याचा आरोप आहे. ईदचे कपडे विकत घेऊन देण्याच्या बहाण्याने हॉटेलवर नेण्याचा प्रयत्न केला. पीडितेनुसार इमरान तिला म्हणाला “तू मुस्लिम आहेस आणि मी सुद्धा मुस्लिम. तुला माझ्या रुमवर येऊन झोपावं लागेल. त्याचवेळी तुझ्या तक्रारीवर कारवाई होईल. अन्यथा तुलाच तुरुंगात पाठवेन” इमरानने पीडितेला शपथ देऊन तोंड बंद ठेवण्याची धमकी दिली.

अश्लील चर्चेची रेकॉर्डिंग एसएसपींकडे सोपवली

पीडितेने शिपाई इमरान सोबत झालेल्या अश्लील चर्चेची रेकॉर्डिंग एसएसपींकडे सोपवली आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य आरक्षी इमरान खानला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलं आहे. क्वार्सी पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय.

Follow Us
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर