AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्लफ्रेंडच्या वाढदिवसासाठी केकही आणला, पण… खोलीचा दरवाजा उघडल्यावर ते दृश्य पाहून डोळेच विस्फारले !

बऱ्याच वेळेपासून बंद असलेल्या खोलीतून दुर्गंध येऊ लागल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी जोर लावून दरवाजा उघडला असता, आतमध्ये जे दृश्य दिसले ते पाहून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.

गर्लफ्रेंडच्या वाढदिवसासाठी केकही आणला, पण... खोलीचा दरवाजा उघडल्यावर ते दृश्य पाहून डोळेच विस्फारले !
| Updated on: Jun 23, 2023 | 11:41 AM
Share

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एक नव्या घटनेने खळबळ उडाली आहे. मौर्य एन्क्लेव्ह भागातील जीपी ब्लॉकमधील एका खोलीतून दुर्गंध येऊ लागल्यानंतर स्थानिकांनी पोलीसांना माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जोर लावून खोलीचा दरवाजा उघडला असता, आतील दृश्य बघून सर्वांचे (crime news) डोळे विस्फारले. खोलीत एक बर्थडे केक (cake) ठेवला होता, आणि त्याच्या शेजारीच एक तरूणाचा मृतदेह (dead body) आढळलल्याने सर्वच चमकले.

या खोलीतून खूपच दुर्गंध येऊ लागल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी मौर्य एन्क्लेव्ह पोलीस ठाण्यात याची माहिती दिली होती. त्या खोलीत राहणाऱ्या २० वर्षीय तरूणाने टोकाचे पाऊल उचलत स्वत:चे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि त्याच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली. प्रिंस असे या मृत तरूणाचे नाव असल्याचे समजते.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरूण गेल्या काही दिवसांपासून एका मुलीशी फोनवर सतत बोलत असे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी त्या मुलीचाच वाढदिवस होता. पोलिसांनी खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर त्या मुलाच्या मृतदेहाच्या शेजारी त्यांना एक केक ठेवलेला आढळला. त्यावर हॅपी बर्थडेचा मेसेजही लिहीला होता. एवढी सगळी तयारी केल्यावरही त्या तरूणाने असे टोकाचे पाऊल का उचलले असा प्रश्न उपस्थित होत आहे.  पोलिसांनी या घटनेची माहिती नातेवाईकांना दिल्यावर रडून-रडून त्यांची अवस्था बिकट झाली होती.

तरूणाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून पिढील तपास सुरू आहे. त्या तरूणाने खरंच आत्महत्या करून आयुष्य संपवले की त्याच्या मृत्यूमागे इतर कोणाचा हात आहे, हे पोलिसांच्या चौकशीनंतर स्पष्ट होऊ शकेल. पोस्टमॉर्टमच्या अहवाालानंतर याप्रकरणातील अधिक माहिती समोर येऊ शकेल.

Follow Us
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत