धावत्या रेल्वेजवळ इन्स्टाग्राम रील बनवत होता तरुण, ट्रेनच्या धडकेत गंभीर जखमी

| Updated on: Sep 05, 2022 | 9:16 PM

तेलंगणातील काझीपेठमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. स्टंट करताना ट्रेनच्या धडकेने तरुण हवेत उडाला आणि रेल्वे रुळाजवळ पडला. गंभीर जखमी तरुणाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धावत्या रेल्वेजवळ इन्स्टाग्राम रील बनवत होता तरुण, ट्रेनच्या धडकेत गंभीर जखमी
धावत्या रेल्वेजवळ इन्स्टाग्राम रील बनवत होता तरुण, ट्रेनच्या धडकेत गंभीर जखमी
Image Credit source: Aaj Tak
Follow us on

कर्नाटक : धावत्या रेल्वेसोबत इन्स्टाग्राम रील (Instagram Reel) बनवणे एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहेत. रील बनवण्याच्या नादात असलेल्या तरुणाला भरधाव रेल्वेने जोरदार धडक दिली. यात तरुण गंभीर जखमी (Injured) झाला आहे. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तरुणाचा मित्रच त्याचा रील व्हिडिओ (Reel Video) बनवत होता. याप्रकरणी काझीपेठ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेनच्या धडकेत तरुण हवेत उडाला

तेलंगणातील काझीपेठमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. स्टंट करताना ट्रेनच्या धडकेने तरुण हवेत उडाला आणि रेल्वे रुळाजवळ पडला. गंभीर जखमी तरुणाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

रेल्वे ट्रॅकवर रील बनवण्यासाठी गेला होता

जखमी तरुण कॉलेजमध्ये प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण त्याच्या मित्रासोबत रेल्वे ट्रॅकजवळ ‘रील’ बनवण्यासाठी आला होता. धावत्या रेल्वेसोबत तरुण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत होता.

हे सुद्धा वाचा

तरुणाची प्रकृती चिंताजनक

रेल्वे गार्डला तरुण रुळावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसल्याने तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून त्याला चांगल्या उपचारासाठी हैदराबादला हलविण्याची सूचना केली आहे.

मित्राने व्हिडिओ बनवण्यास सुरवात करताच तरुण रेल्वे ट्रॅकजवळ उभा राहिला. तेवढ्यात मागून एक हायस्पीड ट्रेन आली. या ट्रेनने तरुणाला जोरदार धडक दिली. या धडकेत तरुण हवेत उडाला आणि रेल्वे रुळावर पडला.

जखमी तरुणाची आई आणि भाऊ हे रोजंदारी मजूर असून रेल्वे ट्रॅकला लागून असलेल्या वस्तीत राहतात. त्याच्या वडिलांचे काही काळापूर्वी आजारपणामुळे निधन झाले होते. (Youth injured in train collision while making Instagram reel near running train)