AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुकून प्लेटला हात लागला अन् मोमोज खाली पडले; आरोपीने तरुणालाच संपवले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मोमोज खाण्यासाठी आलेल्या दोघांमध्ये मोमोजच्या थाळीवरून भांडण झाले. ज्यामध्ये एका व्यक्तीने दुसऱ्याची हत्या केली.

चुकून प्लेटला हात लागला अन् मोमोज खाली पडले; आरोपीने तरुणालाच संपवले
पंजाबमध्ये शाळा उडवण्याची धमकी
| Updated on: Sep 05, 2022 | 8:09 PM
Share

नवी दिल्ली : नवी दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोमोज (Momos)वरुन झालेल्या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणातून एका तरुणावर वार करुन (Attack on Youth) त्याला संपवल्याची घटना दिल्लीतील रणहोला परिसरात घडली आहे. जितेंद्र मेहतो असे हत्या (Murder) करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मयत तरुण मोहन गार्डन परिसरातील रहिवासी आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण परिसर सील करून तपास सुरू केला. तरुणाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आरोपी पोलिसांकडून अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मोमोज खाण्यासाठी आलेल्या दोघांमध्ये मोमोजच्या थाळीवरून भांडण झाले. ज्यामध्ये एका व्यक्तीने दुसऱ्याची हत्या केली. आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नेमके काय घडले ?

मयत तरुण आणि आरोपी दोघेही एका हॉटेलमध्ये मोमोज खाण्यासाठी गेला होता. मयत तरुण आधी तेथे गेला होता आणि मोमोज खात होता तर आरोपी नंतर आला आणि मोमोज घेऊन आपल्या टेबलकडे जात होता.

यादरम्यान चुकून मयत तरुणाचा हात आरोपीच्या मोमोजच्या प्लेटला लागला आणि मोमोज खाली पडले. यावरुन आरोपी संतापला आणि तरुणाला शिवीगाळ करु लागला. हळूहळू या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले.

आरोपी दारुच्या नशेत तर्र होता. आरोपीने खिशातून चाकू काढला मयत तरुणावर वार केले. यात तरुण गंभीर जखणी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपीला अटक केले आहे. पोलीस तपास करत आहेत. (A youth was killed in a fight over momos in Delhi)

पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.