भयानक ! मृतदेहाची स्टोरी इन्स्टाग्रामला ठेवली, ‘त्याच’ तरूणाचं अपहरण करून हत्या, पिंपरी चिंचवड हादरलं

| Updated on: Mar 27, 2024 | 8:34 AM

इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवर मृतदेहाची स्टोरी स्टेटस म्हणून ठेवणाऱ्या तरूणाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची भयानक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाकण आणि म्हाळुंगे पोलिसांनी समांतर तपास करत एकाला अटक केली आहे.

भयानक ! मृतदेहाची स्टोरी इन्स्टाग्रामला ठेवली, त्याच तरूणाचं अपहरण करून हत्या, पिंपरी चिंचवड हादरलं
मृतदेहाची स्टोरी इन्स्टाग्रामला ठेवणाऱ्या तरूणाची निर्घृण हत्या
Follow us on

इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवर मृतदेहाची स्टोरी स्टेटस म्हणून ठेवणाऱ्या तरूणाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची भयानक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाकण आणि म्हाळुंगे पोलिसांनी समांतर तपास करत एकाला अटक केली आहे. आदित्य युवराज भांगरे (वय 18) असं हत्या झालेल्या तरूणाचं नाव आहे. आदित्यचे अपहरण करून मग त्याचा खून करण्यात आला. एवढंच नव्हे तर तर नंतर महाराष्ट्र – गुजरात सीमेवर असलेल्या जंगलात त्या मृतदेह अर्धवट जाळण्यात आला. अखेर या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या हत्येप्रकरणी अमर नामदेव शिंदे इसमाला अटक करण्यात आली आहे. मात्र हत्येतील मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाकण परिसरात झालेल्या गोळीबाराप्रकरणी चाकण पोलीस आणि म्हाळुंगे पोलीस हे तपास करत होते. तेव्हा त्यांनी आरोपी अमर नामदेवला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती उघड झाली. या हत्या प्रकरणातील आरोपी राहुल पवार याचा भाऊ रितेश पवारची तीन महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. यातील हत्या झालेला रितेश पवारच्या मृतदेहाची स्टोरी इन्स्टाग्राम स्टोरीला स्टेटस म्हणून ठेवली होती. ज्या आरोपींनी रितेशची हत्या केली ते आरोपी आदित्य भांगरेचे मित्र होते. त्याच संशयावरून आरोपी राहुल याने अमर आणि त्याच्या काही साथीदारांसह मृत इसम आदित्यचे अपहरण केले. ज्या गाडीतून त्याचे अपहरण करण्यात आले, तेथेच वायरने गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली.

‘दृश्यम’ स्टाइलने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

एवढंच नव्हे कर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी हे आदित्यचा मोबाईल गोव्यात घेऊन गेले. ‘दृश्यम’ चित्रपटात दाखवल्याप्रमाणे दिशाभूल करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. मात्र चाकण गोळीबाराप्रकरणी ताब्यात घेतलेल्या अमरकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर सर्व घटनेचा खुलासा झाला. आदित्यचा मृतदेह हा महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरील डोंगरांमध्ये जाळल्याचेही उघड झाले. अखेर याप्रकरणी चाकण आणि म्हाळुंगे पोलिसांनी नामदेवला अटक केली. मुख्य सूत्रधार राहुल पवार हा अद्याप फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. ही कामगिरी म्हाळुंगे आणि चाकण पोलिसांनी केली आहे.