लातूरमध्ये क्वारंटाईन होण्यावरुन वाद, दोघांची हत्या

लातूर जिल्ह्यात क्वारंटाईन होण्यावरुन दोघांची हत्या करण्यात आल (Latur Murder during quarantine) आहे.

लातूरमध्ये क्वारंटाईन होण्यावरुन वाद, दोघांची हत्या

लातूर : लातूर जिल्ह्यात क्वारंटाईन होण्यावरुन वाद झाल्याने दोघांची हत्या करण्यात आली (Latur Murder during quarantine) आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील बोळेगाव येथे घडली. या घनटेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विद्यामान बरमदे सह सात जणांना पोलिसांनी अटक केली (Latur Murder during quarantine) आहे.

आरोपी विद्यमान हा उत्तर प्रदेशहून प्रवास करुन लातूरमध्ये आला होता. त्यामुळे गावातील शहाजी पाटील, वैभव पाटील यांनी तुम्ही प्रवास करुन आलेला आहात, तर तुमचा ट्रक गावाबाहेर लावा आणि तुम्ही शेतात क्वारंटाईन व्हा, असे सांगितले. असे सांगितल्याने आरोपी विद्यामानला राग आला. यामुळे विद्यामान आणि शहाजी, वैभव पाटील यांच्यात वाद निर्माण झाला.

यानंतर विद्यमानने मध्यरात्री आपल्या नातेवाईकांसह शहाजी पाटील यांच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात शहाजी पाटील आणि वैभव पाटील यांची हत्या करण्यात आली. तर शत्रुघन पाटील गंभीररित्या जखमी झाले आहेत.

आरोपीचा विद्यमान बरमदे हे मुंबईत राहतात. त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. पोलिसांनी आरोपीसह सात जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

नांदेडमध्ये बाल तपस्वी निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या

इन्स्टाग्रामवरील मैत्री महागात, पेणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *