गुंगीचे औषध देऊन रशियन महिलेवर बलात्कार, पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

एका रशियन नागरिक असलेल्या महिलेने तिच्यावर एका पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार (Rape on Russian women in India) केल्याची तक्रार दिली आहे.

गुंगीचे औषध देऊन रशियन महिलेवर बलात्कार, पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

मुंबई: एका रशियन नागरिक असलेल्या महिलेने तिच्यावर एका पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार (Rape on Russian women in India) केल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी अनिल जाधव यांच्याविरोधात गुन्हा (Allegations of Rape on Police Officer) दाखल झाला आहे. चेंबूर आरोपीने पोलीस अधिकाऱ्याने मागील 12 वर्ष अत्याचार करत वारंवार गर्भपात केल्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे.

व्हिजा वाढवून देण्याच्या निमित्ताने 2003 मध्ये आरोपी पोलीस अधिकारी अनिल जाधवशी ओळख झाल्याचं पीडितेने म्हटलं आहे. आरोपीने ओळख झाल्यानंतर गुंगीचं औषध देऊन वारंवार बलात्कार केला. माझ्या मुलाला आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला, असाही आरोप पीडित महिलेने केला आहे.

‘बहिण भावाचा खून करुन पुण्यात मृतदेह गाडले’

आरोपी पोलीस अधिकारी जाधवने एका तरुणीचा आणि तिच्या भावाचा खून आपल्या समक्ष केला. त्यानंतर त्याने त्या बहिण भावाचे मृतदेह पुण्यात एका ठिकाणी गाडले आहेत, असा खळबळजनक खुलासा पीडितेने केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे. या प्रकरणी तिचे वकील नितीन सातपुते यांनी माध्यमांना या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. तसेच आरोपी पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाईची मागणी केली.

आरोपी पोलीस अधिकारी अनिल जाधव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी ज्योत्स्ना जाधव यांचा पती असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणात काही राजकीय दबाव येणार का हेही पाहावे लागणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *