AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sainik School Admission 2022: सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी थोडेच दिवस बाकी

देशातील 33 सैनिक शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक सत्र 2022-23 साठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालीय. सहावी आणि नववी या दोन्ही वर्गांसाठी प्रवेश अर्ज घेतले जात आहेत.

Sainik School Admission 2022: सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी थोडेच दिवस बाकी
aissee
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Oct 17, 2021 | 6:22 PM
Share

Sainik School Admission 2022 details नवी दिल्ली: देशातील 33 सैनिक शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक सत्र 2022-23 साठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालीय. सहावी आणि नववी या दोन्ही वर्गांसाठी प्रवेश अर्ज घेतले जात आहेत. सैनिक शाळा सहावी आणि नववीची प्रवेश परीक्षा 2022 जानेवारी मध्ये घेण्यात येईल. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेतली जाईल. या परीक्षेचे नाव अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE) आहे.

9 जानेवारीला प्रवेश परीक्षा

सैनिक शाळा प्रवेश परीक्षा 2022 रविवार 9 जानेवारी 2022 रोजी NTA द्वारे आयोजित केली जाईल. जर तुम्हाला सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा असेल अंतिम मुदतीचा वाट न पाहता अर्ज दाखल करणं आवश्यक आहे.

सैनिक शाळा प्रवेश वेळापत्रक 2022: महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – 27 सप्टेंबर 2021 ते 26 ऑक्टोबर 2021 अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर रात्री 11.50 पर्यंत भरलेल्या ऑनलाइन फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची संधी – 28 ऑक्टोबर 2021 ते 02 नोव्हेंबर डाऊनलोड करण्याची तारीख प्रवेशपत्र 2021 – NTA च्या वेबसाईटवर नंतर कळवले जाईल प्रवेश परीक्षेची तारीख – 09 जानेवारी 2022 परीक्षेची वेळ – सहावीसाठी दुपारी 2 ते 4.30, वर्ग नववीसाठी दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत परीक्षा होईल निकालाची तारीख संध्याकाळी- NTA द्वारे नंतर जाहीर केली जाईल

अर्ज कसा करावा

सैनिक शाळा प्रवेश अर्ज वेबसाईट aissee.nta.nic.in वर  दाखल करता येणार आहे. या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारला जाणार नाही. AISSEE 2022 मध्ये प्रवेश अर्जासाठी शुल्क भरावे लागेल. खुला, ओबीसी नॉन क्रिमीलेअर (केंद्रीय यादीनुसार) आणि संरक्षण कर्मचाऱ्यांच्या माजी सैनिक मुलांसाठी अर्ज शुल्क 550 रुपये आहे. एससी, एसटी श्रेणीसाठी अर्ज शुल्क 400 रुपये आहे. हे शुल्क देखील फक्त ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.

सैनिक शाळा प्रवेश हेल्पलाईन

सैनिक शाळा प्रवेश 2022 शी संबंधित कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी एनटीएने हेल्पलाईन क्रमांक देखील जारी केला आहे. तुम्ही सोमवार ते शनिवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत 011-40759000 किंवा 011-69227700 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही aissee@nta.ac वर ईमेल पाठवून तुमच्या समस्येचे निराकरण देखील करू शकता.

 इतर बातम्या:

Fci Recruitment 2021: भारतीय खाद्य निगम पंजाबमध्ये 860 वॉचमन पदांसाठी भरती, आठवी उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी

औरंगाबाद: सायबर गुन्ह्यांच्या तपासाला वेग मिळणार, छावणीत सायबर क्राइम विभाग सुरू

Aissee sainik school admission 2022 application form entrance exam few days remaining for online application

Follow Us
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर मुख्यंमत्र्यासोबतच्या विमान प्रवासाबाबत दिली मोठी अपडेट
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो