AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळेची फी नको, प्लास्टिकचा कचरा द्या! जेवण, पुस्तकं, स्टेशनरीही फ्री घ्या…. आहे कुठे ही शाळा?

पद्मपाणी ही शाळा 2014 मध्ये सुरु झाली. सध्या शाळेत पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवलं जातं

शाळेची फी नको, प्लास्टिकचा कचरा द्या! जेवण, पुस्तकं, स्टेशनरीही फ्री घ्या.... आहे कुठे ही शाळा?
Image Credit source: social media
| Updated on: Oct 22, 2022 | 8:54 AM
Share

पाटणाः बिहारच्या (Bihar) एका शाळेची सध्या जोरदार चर्चा आहे. ही शाळा  (School)आहे तिथल्या गया जिल्ह्यातली. शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे फीस म्हणून फक्त प्लास्टिकचा कचरा घेतला जातो. बोध गया येथील सेवा बिघा परिसरात ही शाळा आहे. मुलांना एक दंडक आहे. दररोज आपल्या घरातील प्लास्टिकचा कचरा (Plastic waste) शाळेत आणायचा…

मुलंदेखील शाळेची शिस्त पाळतात. घरून आणलेल्या कचरा शाळेच्या गेटजवळ ठेवलेल्या कचरा पेटीत टाकतात. यामुळे संपूर्ण बोध गया हा परिसर पूर्णपणे स्वच्छ राहिलाय.

या शाळेचं नाव आहे पद्मपाणी स्कूल. कचरापेटीत साठलेलं प्लास्टिक विकूनच शाळेचा सगळा खर्च भागवला जातो. मुलांना सांगण्यात आलंय… घरातून कचरा नसेल तर रस्त्यातून येताना कुठेही प्लास्टिकचा कचरा दिसला की तो आणायचा..

शाळेत जमा झालेला हा कचरा रिसायकल होण्यासाठी पाठवला जातो. आलेले पैशांमधून मुलांचे शिक्षण, खाण्या-पिण्याचे पदार्थ, कपडे आणि शालेय साहित्य आणि पुस्तकांवर खर्च केला जातो.

जागतिक ख्यातीचं गाव असल्याने बोधगया इथं देशविदेशातून हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे गाव स्वच्छ-सुंदर ठेवण्याकरिता शाळेनं हा उपक्रम सुरु केलाय. प्लास्टिक तर पर्यावरणासाठी धोकादायक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वातावरण बदल झालेला दिसून येतोय. त्यामुळेच स्थानिक पातळीवर का होईना शाळेनं मोठं परिवर्तन घडवायला सुरुवात केली आहे.

बिहारमधील या शाळेनं पर्यावरण रक्षणाचा एक आदर्श घालून दिलाय. विशेष म्हणजे शाळेला वीजपुरवठा होत नाही. सौरऊर्जेवर सगळी यंत्रणा चालते. पर्यावरण संरक्षणाच्या दिशेनं हे आणखी एक पाऊल आहे.

पद्मपाणी ही शाळा 2014 मध्ये सुरु झाली. सध्या शाळेत पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. बिहार सरकारची या शाळेला मान्यता आहे. शाळेत गरीब कुटुंबातील जवळपास 250 मुलं शिकायला येतात. त्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्याचा शाळेचा प्रयत्न आहे.

बिहार सरकारद्वारे शाळेला मान्यता आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके आणि स्टेशनरी फ्री दिली जाते.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.