CA Intermediate May 2022 Result: सीए इंटरमिजिएट मे 2022 चा निकाल आज! स्कोअरकार्ड डाऊनलोड करण्यासाठी लिंक

| Updated on: Jul 21, 2022 | 8:40 AM

CA Intermediate May 2022 Result: विद्यार्थी त्यांच्या नोंदणीकृत खात्यावर लॉग इन केल्यानंतर त्यांचा पिन नंबर आणि जन्मतारखेच्या मदतीने आपला निकाल पाहू शकतील आणि त्यांचे स्कोअरकार्डही डाउनलोड करू शकतील.

CA Intermediate May 2022 Result: सीए इंटरमिजिएट मे 2022 चा निकाल आज! स्कोअरकार्ड डाऊनलोड करण्यासाठी लिंक
Board Exam
Image Credit source: Official Website
Follow us on

CA Intermediate May 2022 Result: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (ICAI) सीए इंटरमिजिएट मे 2022 परीक्षेचा निकाल (Intermediate May 2022 Result) आज 21 जुलै 2022 रोजी जाहीर होणार आहे. सीए इंटरमिजिएट मे 2022 चा निकाल आयसीएआय icai.nic.in अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला जाईल. विद्यार्थी त्यांच्या नोंदणीकृत खात्यावर लॉग इन केल्यानंतर त्यांचा पिन नंबर आणि जन्मतारखेच्या मदतीने आपला निकाल पाहू शकतील आणि त्यांचे स्कोअरकार्डही डाउनलोड करू शकतील. ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’तर्फे सीए इंटरमिजिएट मे 2022 ही परीक्षा देशभरात 14 मे ते 31 मे 2022 या कालावधीत घेण्यात आली होती. सीए इंटरमिजिएटच्या निकालासोबतच आंतरराष्ट्रीय कर निर्धारण चाचणीचा (आयटीएआय) निकालही जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर लाखो विद्यार्थी आयसीएआयच्या वेबसाईटवर (ICAI Website) जाऊन निकाल पाहणार आहेत. अशावेळी वेबसाइट सर्व्हर डाऊन होणे किंवा वेबसाइट क्रॅश होणे ही समस्या अनेकदा समोर येते. असं झाल्यास खाली दिलेल्या इतर वेबसाइट्सच्या मदतीनेही विद्यार्थ्यांना आपला निकाल तपासता येणार आहे.

या वेबसाइट्सच्या मदतीने आपला निकाल तपासता येणार

  1. icaiexam.icai.org
  2. Caresults.icai.org
  3. icai.nic.in

 डाउनलोड सीए इंटरमिजिएट मे 2022 चे स्कोअरकार्ड 1

  • सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी ‘आयसीएआय’च्या icai.nic.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • यानंतर तुम्ही “सीए इंटरमिजिएट मे 2022 रिझल्ट” या लिंकवर क्लिक करू शकता.
  • आता तुमचा पिन नंबर/अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा, सबमिट बटणावर क्लिक करा.
  • तुमचं सीए इंटरमिजिएट स्कोअरकार्ड तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • स्कोअर कार्ड डाऊनलोड करा, त्याची प्रिंट काढून घ्या.

या दिवसापासून सीए फायनल नोव्हेंबर 2022 सत्राच्या नोंदणीला सीए अंतिम नोव्हेंबर 2022२ सत्रासाठी नोंदणी करता येणार आहे.
नोव्हेंबर 2022 सत्रासाठी सीए नोंदणी विंडो 21 जुलै 2022 रोजी सुरू होईल. परीक्षा 1 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2022 या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. सीए फायनल परीक्षेचा निकाल 15 जुलै २०२२ रोजी जाहीर झाल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. सीए फाउंडेशन निकाल मे 2022 (सीए फाउंडेशन मे 2022 चा निकाल) स्वतंत्रपणे आयसीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला जाईल.