AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CBSE Board 12th Result 2021 : सीबीएसई 12 वी चा निकाल जाहीर, अशी डाऊनलोड करा मार्कशीट

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत यंदा 99.67 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यावेळी 70 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना 95 टक्के गुण मिळाले आहेत. यावर्षी 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीसाठी अर्ज केले होते. यापैकी 13,04,561 नियमित विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे.

CBSE Board 12th Result 2021 : सीबीएसई 12 वी चा निकाल जाहीर, अशी डाऊनलोड करा मार्कशीट
सीबीएसई 12 वी चा निकाल जाहीर, अशी डाऊनलोड करा मार्कशीट
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 30, 2021 | 4:21 PM
Share

CBSE Board 12th Result 2021 नवी दिल्ली : सीबीएसईने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर, cbseresults.nic.in वर जाऊन आपला निकाल तपासू शकतात. या व्यतिरिक्त, आणखी काही डायरेक्ट लिंक्स आहेत, ज्याद्वारे विद्यार्थी त्यांचे निकाल तपासू शकतात. विद्यार्थी indiaresults.com आणि examresults.net वरही आपला निकाल पाहू शकतात. ही सुविधा डिजीलॉकर(DigiLocker) आणि उमंग अ‍ॅपवरही देण्यात आली आहे. (CBSE Board 12th Result 2021 announced, know how to download marksheet)

निकालाव्यतिरिक्त, विद्यार्थी पूर्ण मार्कशीट (How to download CBSE 12th marksheet online) ऑनलाइन डाउनलोड करू शकतात. यासाठी त्यांना शाळेत जाण्याची किंवा प्रतीक्षा करण्याची गरज नाही. सीबीएसईच्या वेबसाईटवर भारी ट्रॅफिकमुळे ते क्रॅश होण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी उमंग अॅप, डिजीलॉकर सारख्या अ‍ॅप्सची मदत घेऊ शकतात. अशा प्रकारे विद्यार्थी त्यांची मार्कशीट डाउनलोड करू शकतात. सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत यंदा 99.67 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यावेळी 70 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना 95 टक्के गुण मिळाले आहेत. यावर्षी 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीसाठी अर्ज केले होते. यापैकी 13,04,561 नियमित विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे.

DigiLocker वरुन असे डाउनलोड करा मार्कशीट

– सीबीएसई बारावीचा निकाल DigiLocker app द्वारे डाउनलोड करु शकता. – सर्वप्रथम आपण digilocker.gov.in वर जा. – वेबसाइटच्या ‘education’ सेक्शनमध्ये जा आणि Central Board of Secondary Education वर क्लिक करा.

येथे डाऊनलोड करु शकता मार्कशीट

– येथे 12 passing certificate आणि Class 12 marksheet निवडा. – CBSE मध्ये रजिस्टर मोबाईल क्रमांकाने लॉग-इन करा आणि आपली मार्कशीट डाऊनलोड करा.

DigiLocker App वर असे पहा मार्कशीट

– प्ले स्टोर किंवा अॅप स्टोर वर जाऊन DigiLocker App डाउनलोड करा – अॅप ओपन करा, ‘Access DigiLocker’ वर क्लिक करा – CBSE मध्ये रजिस्टर मोबाईल क्रमांकासह अन्य माहिती भरा – मोबाईलवर आपली मार्कशीट मिळेल. (CBSE Board 12th Result 2021 announced, know how to download marksheet)

इतर बातम्या

CBSE 12th Result 2021 : सीबीएसई निकाल तुमच्या मोबाईलवर कसा मिळेल?

CBSE 12th Result 2021 : बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी, जाणून घ्या कसा आहे यंदाचा निकाल

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?