CBSE Result 2021: सीबीएसईचा दहावी बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार, CBSE ने cbseresult nic in वेबसाईटचं डिझाईन बदललं

सीबएसईकडून दहावी आणि बारावीचा निकाल cbse.nic.in, cbseacademic.nicin आणि cbseresult.nic.in या वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाणार आहे.

CBSE Result 2021: सीबीएसईचा दहावी बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार, CBSE ने cbseresult nic in वेबसाईटचं डिझाईन बदललं
सीबीएसई

CBSE Class 10 and 12th Result  2021 नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड सीबीएसईकडून दहावी आणि बारावीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. सीबीएसईकडून दहावी आणि बारावीचा निकाल लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात सीबीएसईनं 31 जुलैपूर्वी निकाल जाहीर करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे दहावी आणि बारावीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. सीबएसईकडून दहावी आणि बारावीचा निकाल cbse.nic.in, cbseacademic.nicin आणि cbseresult.nic.in या वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाणार आहे.

सीबीएसईनं वेबसाईटचा लुक बदलला

सीबीएसईनं दिलेल्या माहितीनुसार 31 जुलैची मुदत जवळ येत असल्यानं दहावी आणि बारावीचा निकाल लवकरच जाहीर केला जाऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर सीबीएसईनं दहावी आणि बारावीचा निकालासाठी वेबसाईटचं डिझाईन बदललं आहे. वेबसाईटचं डिझाईन बदलल्यानं लवकरचं निकाल जाहीर होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आळा आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात घोषणा करतीस. तर, सीबीएसई यंदा देखील निकाल जाहीर झाल्यांनतर गुणवत्ता यादी जाहीर करणार नाही.

पर्यायी मूल्यांकन धोरणांच्या आधारे निकाल जाहीर करणार

सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसई आणि इतर राज्य मंडळाला 31 जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. 25 जुलैपर्यंत निकाल अंतिम करण्याचे काम शाळांकडून पूर्ण केले जाईल. त्यानुसार 25 ते 31 जुलै दरम्यान निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. अधिकृतपणे याबद्दल कोणतीही माहिती नाही. कोरोनाची दुसरी लाट पाहता इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. सीबीएसईने जाहीर केलेल्या पर्यायी मूल्यांकन धोरणांच्या आधारे निकाल जाहीर केला जाईल, ज्यासाठी अंतर्गत मूल्यांकन व प्रोजेक्ट यासह दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांचा विचार केला जाईल.

इतर बातम्या:

CBSE Exam : सीबीएसईचा मोठा निर्णय, 10 वी आणि 12 वीची वर्षातून दोनवेळा परीक्षा होणार

CBSE 10th Result 2021: सीबीएसईचा निकाल अंतिम टप्प्यात, काहीच दिवसांत निकाल जाहीर होणार

CBSE Result 2021 class 10th class 12 th result Central Board of Secondary Education change desing of cbseresult nic in check here live updates check here cbse nic in

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI