नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सोमवारी (5 जुलै) 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतलाय. यानुसार यंदा वर्षातून दोनवेळा परीक्षा घेण्यात येणार आहे. सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष 2021-22 ला दोन भागात विभागलं आहे. प्रत्येक सत्रात जवळपास 50 टक्के अभ्यासक्रम ठेवला जाईल. मागील सत्राप्रमाणे 2021-22 च्या अभ्यासक्रमातही कपात केलीय. याबाबत या महिन्यात नोटिफिकेशनही काढण्यात येणार आहे (CBSE announce 2 exams in a year 2020-21 for SSC HSC amid corona).