
देशातील प्रतिष्ठित व्यवस्थापन महाविद्यालये, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM मध्ये कॉमन ॲडमिशन मिळावा यासाठी घेण्यात येणाऱ्या CAT 2025 परीक्षेच्या निकालांबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अधिकृत माहितीनुसार CAT परीक्षेचे निकाल 24 डिसेंबर 2025 रोजी जाहीर केले जाणार आहे. CAT परीक्षा दिलेल्या लाखो उमेदवारांना आज संध्याकाळी 6 वाजता अधिकृत वेबसाइटवरून त्यांचा निकाल तपासून स्कोअरकार्ड डाउनलोड करता येणार आहे. चला तर मग आपण हा निकाल कोणत्या साईडवरून चेक करू शकता ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात.
CAT २०२५ निकाल: निकाल कसा तपासायचा?
निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार या सोप्या स्टेप फॉलो करून त्यांचे स्कोअरकार्ड तपासू शकतील-
प्रथम अधिकृत CAT वेबसाइट, iimcat.ac.in ला भेट द्या.
तुम्हाला होम पेजवरील CAT Result 2025 स्कोअरकार्ड डाउनलोड लिंकवर क्लिक करा.
आता एक नवीन पेज उघडेल, येथे तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल.
त्यानंतर तुमचे स्कोअरकार्ड स्क्रीनवर पीडीएफ नुसार दिसेल. ते तपासा.
भविष्यातील संदर्भासाठी आणि IIM प्रवेश प्रक्रियेसाठी ते तुमच्या निकालाची पीडीएफ प्रिंट काढून ठेवा. तसेच पीडीएफ तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये डाउनलोड करून ठेवा.
कॅट स्कोअरमुळे तुम्हाला 21 आयआयएममध्ये प्रवेश मिळतो
देशातील 21 आयआयएम आणि शेकडो इतर टॉप एमबीए महाविद्यालये कॅट स्कोअरचा वापर करून उमेदवारांना प्रवेश देतात. प्रत्येक महाविद्यालय स्वतःचा कटऑफ जारी करते. उमेदवारांना त्यांच्या टक्केवारीच्या आधारे डब्ल्यूएटी आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाते.