5

देशभरातील शाळा पुन्हा सुरू होणार?; केंद्र सरकार लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करण्याची शक्यता

कोविड संसर्गाने सर्व वयोगटातील मुलांच्या आरोग्यावरती परिणाम केला आहे. त्यामुळे मुलांच्या मृत्यूदराची संख्या नगण्य आहे. त्यामुळे देशातील सर्व मुलांनी शाळेत पुन्हा यायची वेळ झाली आहे असं आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.

देशभरातील शाळा पुन्हा सुरू होणार?; केंद्र सरकार लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करण्याची शक्यता
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 2:10 PM

नवी दिल्ली – 15 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाच्या लसीची मोहिम (Corona vaccine campaign) केंद्र सरकार (Central Government) कडून चालवण्यात येत असून देशभरातील सर्व शाळा सुरू करण्यासंदर्भात एक सल्लागार नेमणार आहे. सूत्रांनी एएनआयला (ANI) दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी राष्ट्रीय तज्ज्ञ गटाला देशव्यापी शाळा उघडण्यासाठी मार्ग सुचवण्यास आणि कार्यपद्धतींवर काम करण्यास सांगितले आहे. त्यामुळे देशातील शाळा लवकरचं सुरू होतील असं वाटतंय. कोविड संसर्गाने सर्व वयोगटातील मुलांच्या आरोग्यावरती परिणाम केला आहे. त्यामुळे मुलांच्या मृत्यूदराची संख्या नगण्य आहे. त्यामुळे देशातील सर्व मुलांनी शाळेत पुन्हा यायची वेळ झाली आहे असं आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी नियमावलीचं पालन तंतोतंत पाळायला हवं.

कोरोनाचा उद्रेक देशात मोठ्या प्रमाणात होणार याची कल्पना केंद्र सरकारला होती, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत तात्काळ देशातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. चीनमध्ये उद्रेक झालेल्या कोरोनाने संपुर्ण देशाला कोरोनाने ग्रासलं होतं. परंतु जिथं कोरोनाचा संसर्ग कमी होता. तिथं सर्व नियमावलीचे पालन करून शाळा भरवण्यात येत होती. काही ठिकाणी बंद झालेल्या शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत, तसेच तिथं अजूनही धोका कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे असे सुत्रांनी एएनआयला सांगितले आहे.

तीन टप्प्यात झालं लसीकरण 

कोरोनामुळे मागच्या दोन वर्षात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे केंद्राचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आता पंधरा वर्षाच्या मुलांचं लसीकरण राबवणार असल्याचं जाहीर केलं आहे. 16 जानेवारी 2021 ला संपुर्ण देशात देशव्यापी लसीकरण राबिवण्यात आले. 1 मे 2021 पासून 18 वर्षावरील सर्व लोकांचे लसीकरण सुरू केले. कोविड-19 लसीकरणाचा पुढील टप्पा 3 जानेवारीपासून 15 वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी सुरू झाला. आत्तापर्यंत देशातील 95 टक्के लोकांनी कोरोना लस घेतली असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे

देशात आत्तापर्यंत कोरोनाची लसीकरण झालेली संख्या 164.35 कोटी (1,64,35,41,869) इतकी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक देशांनी आपलं लसीकरण मोहिम सुरू केली होती. तशी भारतात ही लसीकरण मोहीम केंद्र सरकारकडून राबिवण्यात आली आहे. सुरूवातील ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली. त्यानंतर वयाच्या टप्प्याने संपुर्ण देशात लसीकरण करण्यात आलं. आता शाळेतील मुलांना लस देण्याचं काम जानेवारी 2022 पासून सुरू केलं आहे.

आदित्य सरोवर, अंबादास फुलपाखरू उद्यान, चंद्रकांत लॉनची औरंगाबादेत चर्चा, सात-बारा शिवसेनेचा आहे का? भाजपचा सवाल

आमदारांविरोधात षड्यंत्र रचणाऱ्यांनी 12 मतदार संघाच्या नागरिकांची माफी मागितली पाहिजे, देवेंद्र फडणवीस यांची मागणी

Maharashtra Mla Suspension: 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय माईलस्टोन ठरणार का?; वाचा कायदेतज्ज्ञ काय म्हणतात

आपके लिए
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
'त्या' फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांचा सवाल, म्हणाले...
'त्या' फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांचा सवाल, म्हणाले...
ऑनलाईन गेमच्या नादात गमावले तब्बल ५८ कोटी, बघा नेमकं काय घडलं?
ऑनलाईन गेमच्या नादात गमावले तब्बल ५८ कोटी, बघा नेमकं काय घडलं?
बावनकुळे यांचा भाजपच्या नव्या कार्यकारिणी थेट इशारा, 'तर राजीनामा घेऊ'
बावनकुळे यांचा भाजपच्या नव्या कार्यकारिणी थेट इशारा, 'तर राजीनामा घेऊ'
रामदास कदमांचा नाव न घेता इशारा, 'राजकीयदृष्ट्या स्मशानात जावं लागणार'
रामदास कदमांचा नाव न घेता इशारा, 'राजकीयदृष्ट्या स्मशानात जावं लागणार'
वृक्ष संवर्धनाचा अनोखा संदेश, विद्यार्थ्यांनी साकारला झाडाचा गणपती
वृक्ष संवर्धनाचा अनोखा संदेश, विद्यार्थ्यांनी साकारला झाडाचा गणपती