AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रपूरच्या मनपा शाळांची बातच न्यारी, कॉन्वेंटच्या विद्यार्थ्यांचीही मनपा शाळांना पसंती, पालिकेच्या शाळा हाऊसफुल

महानगरपालिकेने आता आपल्या शाळा अद्यावत करण्याचं ठरवलं. त्यादिशेनं पहिलं पाऊल महापालिकेनं टाकलं. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भागातील ही शाळा. पहिली ते दहावीचे वर्ग इथं चालतात. सेमी इंग्रजी माध्यम. शाळा बघताच एखादी खासगी शाळा असावी, असा भास होतो.

चंद्रपूरच्या मनपा शाळांची बातच न्यारी, कॉन्वेंटच्या विद्यार्थ्यांचीही मनपा शाळांना पसंती, पालिकेच्या शाळा हाऊसफुल
शाळा
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 3:42 PM
Share

चंद्रपूर: शिक्षणाचे दिल्ली मॉडेल रुजवण्याचा प्रयत्न चंद्रपूर महापालिकेने सुरू केलाय. त्याला यशही मोठं मिळू लागल्याचं चित्र बघायला मिळत आहे. इंग्रजी शाळातील विद्यार्थी मनपाच्या शाळेत प्रवेश घेऊ लागल्यानं प्रवेश आता थांबवण्यात आले आहेत.

शाळा बघताच खासगी शाळा असल्याचा भास

शासकीय शाळा म्हटली की, डोळ्यासमोर येते ती जुनी-गळणारी इमारत, अस्वच्छता, सोयीसुविधांचा अभाव आणि रोडवलेली विद्यार्थी संख्या. या परिस्थितीमुळं अनेक सरकारी शाळा बंद पडल्या आणि त्याचा थेट लाभ इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा म्हणजेच कॉन्व्हेंटनी उचलला. अशा वातावरणात सर्वसामान्यांना दिलासा देणारी कृती चंद्रपूर महापालिकेनं केली आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाचा एक नवा मार्ग गवसला. चंद्रपूर महानगरपालिकेने आता आपल्या शाळा अद्यावत करण्याचं ठरवलं. त्यादिशेनं पहिलं पाऊल महापालिकेनं टाकलं. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भागातील ही शाळा. पहिली ते दहावीचे वर्ग इथं चालतात. सेमी इंग्रजी माध्यम. शाळा बघताच एखादी खासगी शाळा असावी, असा भास होतो.

शाळेच्या भिंती बोलक्या

शाळेचं केवळ बाह्य रूपच सुंदर आहे, असं नाही. अंतरंगही मनोवेधक आहे. शाळांच्या भिंती बोलक्या आहेत. बसण्याची व्यवस्था नेटकी. पिण्याचं स्वच्छ पाणी, अग्निशमन बंब, पंखे आणि शिक्षकांची पूर्ण उपस्थिती. दिल्लीतील शासकीय शाळांच्या धर्तीवर ही शाळा उभी करण्यात आलीय. सध्या कोरोनामुळं शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण दिलं जात असलं तरी ऑफलाईन शिक्षणासाठी काही विद्यार्थी शाळेत हजेरी लावत आहेत. ज्यांना कॉन्व्हेंटचं शिक्षण परवडत नाही, अशा पालकांसाठी ही शाळा मोठी संधी निर्माण करून देणारी ठरलीय. शिक्षणाप्रती आस्थेवाईक असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचं नवं दालन यानिमित्तानं उघडं झालंय.

कॉन्वहेंटचे विद्यार्थी महापालिकेच्या शाळेत

महापालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू आणि तेलगु शाळा शहरात सुरू आहेत. त्या सर्व शाळा येत्या काळात अशाच स्वरूपाच्या होणार आहेत. काम प्रगतीपथावर आहे. या शाळेत डिजीटल पद्धतीने शिक्षण सुरु केल्यामुळे कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी आता मनपाच्या शाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत. त्यामुळे 2013 मध्ये केवळ 70 पटसंख्या असलेल्या या शाळेत आता 900 वर विद्यार्थी आहेत. अजूनही प्रवेशासाठी विद्यार्थी येत आहेत. पण हा प्रवेश बंद करण्यात आलाय. महापालिकेच्या शाळेत प्रवेश फुल्ल झाल्याची पाटी लागावी, हीच मुळी अपूर्वाई आहे, असं शिक्षक नागेश नीत यांनी सांगितलं.

महापालिकेच्या 29 शाळा कार्यरत

चंद्रपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत एकूण 29 शाळा कार्यरत आहेत. यामध्ये तीन शाळांत तेलुगु, तीनमध्ये हिंदी, दोनमध्ये उर्दू शिक्षण दिलं जात असून, 21 शाळांत मराठी-सेमी इंग्रजी शिकवलं जातं. यात सोळा शाळांमध्ये नर्सरी, केजीचं शिक्षणसुद्धा दिलं जात आहे. येत्या काळात महापालिकेच्या सर्वच शाळा गुणात्मक विकसित केल्या जाणार असून, सर्वसामान्यांना शिक्षणासाठी सुदृढ वातावरण तयार केलं जाणार आहे, अशी माहिती चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार यांनी दिली.

2016-17 मध्ये या सर्व शाळांतील विद्यार्थीसंख्या 2571 होती. ती यावर्षी 3454 इतकी झाली आहे. सरकारी शाळांची अशी सुधारणा झाल्यास शिक्षणाच्या नावावर वारेमाप शुल्क घेणाऱ्या खासगी शाळांना नक्कीच चाप बसू शकेल, यात शंका नाही.

इतर बातम्या

Maharashtra FYJC CET 2021 : अकरावीच्या सीईटी परीक्षेबाबत नवा पेच, ICSE, IGCSE च्या विद्यार्थ्यांची शिक्षणमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

Maharashtra FYJC CET 2021: अकरावीच्या सीईटी परीक्षेसाठी पहिल्याच दिवशी एक लाख विद्यार्थ्यांचे अर्ज

Chandrapur Municipal Corporation school changed like Delhi Model students admission closed convent student also admitted

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.