बारावी नंतर पुढे काय? कला शाखेतून कोणत्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा? वाचा सविस्तर

| Updated on: Aug 10, 2021 | 8:57 AM

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई आणि पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये विज्ञान आणि वाणिज्य शाखांऐवजी कला शाखेचं मेरिट अधिक लागल्याचं पाहायला मिळतं. अभियांत्रिकीमधील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर चांगल्या नोकरीची संधी मिळण्याची हमी नसल्यानं विद्यार्थ्यांचा ओढा कला शाखेकडे वाढला असल्याचं दिसून आलं आहे.

बारावी नंतर पुढे काय? कला शाखेतून कोणत्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा? वाचा सविस्तर
विद्यार्थी
Follow us on

मुंबई: कोरोना विषाणू संसर्गामुळं यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. पर्यायी मूल्यांकन धोरणाच्या आधारे देशातील विविध बोर्डांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ आणि सीबीएसईच्या दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. भारतीय शिक्षण व्यवस्थेत सर्वाधिक विद्यार्थी कला शाखेला प्रवेश घेतात. कला शाखेचं चित्र गेल्या काही दिवसांपासून बदललं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई आणि पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये विज्ञान आणि वाणिज्य शाखांऐवजी कला शाखेचं मेरिट अधिक लागल्याचं पाहायला मिळतं. अभियांत्रिकीमधील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर चांगल्या नोकरीची संधी मिळण्याची हमी नसल्यानं विद्यार्थ्यांचा ओढा कला शाखेकडे वाढला असल्याचं दिसून आलं आहे.

मानव्यविद्याशास्त्र आणि कला शाखा यांना सारखं समजलं जातं. कला शाखेचे प्रामुख्यानं दोन विभाग करता येतात त्यामध्ये मानव्यविद्याशास्त्र आणि फाईन आर्टस याचा समावेश होतो. मानव्यविद्या शास्त्रांमध्ये भाषा, मानसशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आदीचा समावेश होतो. तर फाईन आर्टसमध्ये नाट्यशास्त्र, शिल्पकला, विज्युअल आर्टस, आदीचा समावेश होतो.

कला शाखेतील बारावी नंतरचे अभ्यासक्रम

बीए

भारतातील प्रत्येक विद्यापीठातून आर्टस शाखेतील पदवीचं शिक्षण घेता येऊ शकतं. विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये देखील अर्ज दाखल करता येतात. भाषा विषय आणि सामाजिक शास्त्रांतील विषयांमध्ये पदवी पूर्ण करु शकतात. मुंबईतील विल्सन कॉलेज, के सी कॉलेज, रुईया कॉलेज, साठ्ये कॉलेज तर पुण्यात फर्ग्यूसन कॉलेज, गरवारे, मॉडर्न , सिम्बॉयसिस महाविद्यालयात कला शाखेच्या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांची पसंती असते.

बीएएलएलबी

बीए आणि कायद्याचं शिक्षण एकत्रित घ्यायचं असल्यास बीएएलएलबी हा एक चांगला पर्याय आहे. बारावी कला शाखेचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असल्यास एमएचसीईटी, क्लॅट, लॉसीईटी द्यावी लागते. मात्र, विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत 50 टक्के गुण मिळालेले असणं आवश्यक आहे.

इतर अभ्यासक्रम

बॅचलर ऑफ हॉस्पिटीलीटी मॅनेजमेंट, बॅचरल फिजीकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अ‌ॅप्लिकेशन, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ, बॅचलर ऑफ बिझनेस अ‌ॅडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, हॉटेल मॅनेजमेंट, रिटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग

कला शाखेचे फायदे

कला शाखेच्या अभ्यासक्रमातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकांच्या परीक्षांच्या तयारी करताना फायदा होतो.

इतर बातम्या:

PGCIL Apprentice Recruitment 2021: पॉवरग्रीडमध्ये 1110 पदांवर अप्रेटिंसची संधी, अर्ज करण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक

BSF Recruitment 2021: बीएसएफमध्ये नोकरीची सुवर्णसंधी , जीडी कॉन्स्टेबलच्या 269 पदांवर भरती

Courses after 12 arts know details about various courses Arts stream