BSF Recruitment 2021: बीएसएफमध्ये नोकरीची सुवर्णसंधी , जीडी कॉन्स्टेबलच्या 269 पदांवर भरती

बॉर्डर सिक्युरीटी फोर्स म्हणजेच सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. BSF द्वारे जनरल ड्युटी कॉन्स्टेबल पदावर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. स्पोर्टस कोट्यातून पात्र खेळाडूंसाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे.

BSF Recruitment 2021: बीएसएफमध्ये नोकरीची सुवर्णसंधी , जीडी कॉन्स्टेबलच्या 269 पदांवर भरती
Job

नवी दिल्ली: बॉर्डर सिक्युरीटी फोर्स म्हणजेच सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. BSF द्वारे जनरल ड्युटी कॉन्स्टेबल पदावर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बीएसएफमध्ये नॉन-गॅझेटेड आणि नॉन-मिनिस्ट्रियल कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) ग्रुप सी च्या पदांसाठी भरती करण्यात येत आहे. एकूण 269 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. स्पोर्टस कोट्यातून पात्र खेळाडूंसाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे.

269 पदासांठी भरती

बीएसएफ द्वारे एकूण 269 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे आणि या सर्व रिक्त जागा क्रीडा कोट्यासाठी घोषित करण्यात आल्या आहेत. बीएसएफ कॉन्स्टेबल जीडी भर्ती 2021 अधिसूचनेनुसार, बीएसएफ जीडी कॉन्स्टेबल रिक्रूटमेंट ग्रुप सी पदांची भरती कंत्राटी तत्त्वावर केली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असणं गरचेचं आहे.

अर्ज कुठे करावा?

बीएसएफ कॉन्स्टेबल जीडी भरती 2021 साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत भरती पोर्टल rectt.bsf.gov.in या वेबसाईटवर अर्ज करु शकतात. . बीएसएफ जीडी कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज प्रक्रिया 9 ऑगस्ट 2021 पासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार 22 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

शैक्षणिक पात्रता

बीएसएफ स्पोर्ट्स कोट्या अंतर्गत कॉन्स्टेबल जनरल ड्यूटी (बीएसएफ जीडी कॉन्स्टेबल रिक्रूटमेंट) च्या पदांसाठी खेळाडू असणं आवश्यक आहे. ज्यांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि संबंधित क्रीडा प्रकारात विहित स्तरावर 1 सप्टेंबर 2019 ते 22 सप्टेंबर 2021 दरम्यान किंवा पदक मिळवलं आहे ते अर्ज दाखल करु शकतात.

शारीरिक पात्रता

पुरुष उमेदवारांची उंची किमान 170 सेमी आणि महिला उमेदवारांची किमान 157 सेमी असावी. तसेच, पुरुष उमेदवारांची छाती किमान 80 सेमी आणि विस्तार किमान 5 सेमी असावा. या व्यतिरिक्त, 1 ऑगस्ट 2021 रोजी उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 23 वर्षांपेक्षा जास्त नसावे. पात्रतेसंबंधी अधिक माहितीसाठी बीएसएफकडून जारी करण्यात आलेलं नोटिफिकेशन पाहू शकता. जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा.

इतर बातम्या:

आरोग्य विभागात 3 हजार 466 जागांवर बंपर भरती, अर्ज करा अन् मिळवा नोकरी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं पुढचं पाऊल, ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरु होणार, वाचा सविस्तर

BSF Constable Recruitment 2021 Vacancy for GD Constable post with Sports Quota know how to Apply

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI