AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC Result 2022: आली रे आली, आता SSC वाल्यांची बारी आली! निकाल लवकरच लागणार…

महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला हा निकाल पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर बारावीप्रमाणे दहावीचा देखील निकाल तुम्हाला आमच्या TV9 मराठीच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल ज्याची माहिती आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवू.

SSC Result 2022: आली रे आली, आता SSC वाल्यांची बारी आली! निकाल लवकरच लागणार...
आली रे आली, आता SSC वाल्यांची बारी आली! Image Credit source: TV9 marathi
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 10, 2022 | 11:07 AM
Share

नुकताच बारावीचा निकाल (HSC Results 2022) लागलाय. आता पालक आणि विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे ती दहावीच्या निकालाची. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीचा निकाल दुसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागेल असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे बारावीचा निकाल तर लागला पण दहावीचा कधी लागणार या बाबत आता उत्सुकता आहे. लवकरच दहावीच्या निकाला (SSC Results) बाबत आवश्यक माहिती जारी होऊ शकते. राज्यसभेची निवडणूक पार पडल्यानंतर हा निकाल लागू शकतो अशी शक्यता वर्तविली जातीये. 15 जून 2022 पर्यंत महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकाल लागणं अपेक्षित आहे. निकाल पाहण्यासाठी स्वतःचा रोल नंबर आणि आईचं नाव अशी माहिती विद्यार्थ्यांकडे असावी. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर (Maharashtra Board Official Website) तुम्हाला हा निकाल पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर बारावीप्रमाणे दहावीचा देखील निकाल तुम्हाला आमच्या TV9 मराठीच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल ज्याची माहिती आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवू.

16 लाख विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत

कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी दहावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचा लेखी परीक्षेचा सराव कमी झाला, शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला, ऑफलाईन परीक्षा हो नाही करत अखेर झाल्या अशा अनेक अडचणींना पार करत विद्यार्थी इथवर पोचलेत. आता तब्बल 16 लाख विद्यार्थी दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. हा निकाल 15 जून 2022 रोजी लागण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल कसा पाहायचा

  • mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवर, दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • तुमची आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा.
  • “निकाल पहा” बटणावर क्लिक करा.
  • महाराष्ट्र राज्य बोर्ड 10वीचा निकाल 2022 स्क्रीनवर दिसेल.
  • भविष्यातील वापरासाठी Save करा.

रिझल्ट चेक करताना काय महत्त्वाच्या बाबी

  1. संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सीट नंबर वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्या.
  2. सीट नंबर आणि आईचं नाव या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी
  3. सीट नंबर काही कारणाने चुकला तर आईच्या नावाने रिझल्ट चेक करता येणार आहे
  4. आईचं नाव काही कारणानं चुकलं किंवा अजून काही गडबड झाली तरी सीट नंबरने सुद्धा रिझल्ट चेक करता येणार आहे
  5. महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल वेबसाईट

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान