JEE आणि NEET परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांना सल्ला

| Updated on: Dec 13, 2020 | 1:23 PM

रमेश पोखरियाल निशंक यांनी JEE आणि NEET परीक्षेच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले. (Education Minister JEE NEET Exam)

JEE आणि NEET परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांना सल्ला
आयसीएसई आणि आयएससी परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक जाहीर
Follow us on

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी JEE आणि NEET परीक्षेच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले. रमेश पोखरियाल यांनी सोशल मीडियावर एका लाईव्ह कार्यक्रमात ही माहिती दिली. आगामी काळात कोणतीही परीक्षा रद्द होणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर संवाद साधताना पोखरियाल यांनी CBSE आणि JEE, NEET परीक्षाविषयी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. (Education Minister statement on JEE and NEET Exam)

रमेश पोखरियाल यांच्या लाईव्ह सेशनमध्ये प्रत्येक क्षेत्रातील विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पोखरियाल यांना विविध प्रश्न विचारले. शिक्षणमंत्री पोखरियाल यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना JEE आणि NEET परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

नीट परीक्षेच्या पॅटर्नबाबत विद्यार्थ्यांनी विचारले असता पोखरियाल यांनी नीट परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचा विचार असल्याचे सांगितले. सीबीएसईने अभ्यासक्रमात 30 टक्के कपात केली आहे. त्यामुळे जेईई परीक्षेत विद्यार्थ्यांनी ज्या अभ्यासक्रमाचा अभ्यास केला, असेल त्यासंबंधी प्रश्नांचा समावेश केला जाईल, असं शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. (Education Minister statement on JEE and NEET Exam)

JEE आणि NEET परीक्षेचे स्वरुप

नीट आणि जेईई परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. जेईई मुख्य परीक्षेमध्ये 75 प्रश्न विचारले जातात. यामध्ये मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयांवर प्रत्येकी 25 प्रमाणे 75 प्रश्न विचारले जातात. नीट परीक्षेत एकूण 180 प्रश्न विचारले जातात. फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयावरीलल 45-45 प्रश्न विचारले जातात आणि बॉयोलॉजीवरील 90 प्रश्न विचारले जातात. शिक्षणमंत्र्यांनी परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रमात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले. (Education Minister statement on JEE and NEET Exam)

CBSE बोर्डाची 10वी आणि 12वीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना प्रश्न विचारले. रमेश पोखरियाल यांनी सीबीएसई बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले. दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असं पोखरियाल यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही पोखरियाल म्हणाले.(Education Minister statement on JEE and NEET Exam)

संबंधित बातम्या:

सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; दहावीची परीक्षा कधी होणार?

उदय सामंतांची प्राध्यापकांसाठी मोठी घोषणा, तब्बल 7 वर्षानंतर संप काळातील वेतन मिळणार

(Education Minister statement on JEE and NEET Exam)