MHT CET 2022 निकाल कसा तपासणार? समुपदेशनाबद्दल माहिती, स्कोअरकार्ड डाऊनलोड करण्यासाठी स्टेप्स
एमएचटी सीईटी 2022 परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल तपासता आणि डाऊनलोड करता येणार आहे.

MHT CET Result 2022 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र आज भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) गटासाठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल 2022 जाहीर करणार आहे. एमएचटी सीईटी 2022परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल तपासता आणि डाऊनलोड करता येणार आहे.
PCM गटासाठी
एमएचटी सीईटी 2022 परीक्षा 5 ऑगस्ट ते 11ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती. त्याचबरोबर पीसीबी ग्रुपची परीक्षा 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2022 या कालावधीत घेण्यात आली होती.
संगणकावर आधारित परीक्षा म्हणून ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली. याशिवाय पीसीएम आणि पीसीबी (पीसीबी) गटाची फेरपरीक्षाही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र यांच्यामार्फत 28ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आली होती.
MHT CET Result 2022: कसा तपासायचा निकाल?
- आधी या अधिकृत संकेतस्थळावर cetcell.mahacet.org जा.
- यानंतर होम पेजवर दिलेल्या एमएचटी सीईटी रिझल्ट 2022 च्या लिंकवर क्लिक करा.
- आता आपले लॉगिन क्रेडेन्शियल्स – अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
- तुमचा एमएचटी सीईटीचा निकाल 2022 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- तुमचे एमएचटी सीईटी स्कोअरकार्ड डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून स्वतःकडे ठेवा.
एकदा एमएचटी सीईटी 2022 चा निकाल जाहीर झाल्यानंतर, अधिकारी पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन एमएचटी सीईटी समुपदेशन 2022 आयोजित करतील.
एमएचटी सीईटी 2022 च्या निकालाच्या आधारेच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. समुपदेशन प्रक्रियेशी संबंधित माहितीसाठी विद्यार्थ्यांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र या अधिकृत संकेतस्थळाला भेट देत राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
