विद्यार्थ्यांचे लसीकरण नाही, लोकलने प्रवास करण्यास मनाई, सीईटी परीक्षा कशी घेणार ? कोर्टाचा राज्य सरकारला सवाल

| Updated on: Aug 06, 2021 | 8:01 PM

राज्यात कोरोना प्रतिबंधक निर्बंध पूर्णपणे हटवलेले नाहीत. लोकल प्रवास सामान्यांसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा कशी घेणार ? असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला.

विद्यार्थ्यांचे लसीकरण नाही, लोकलने प्रवास करण्यास मनाई, सीईटी परीक्षा कशी घेणार ? कोर्टाचा राज्य सरकारला सवाल
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोना प्रतिबंधक निर्बंध पूर्णपणे हटवलेले नाहीत. लोकल प्रवास सामान्यांसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा कशी घेणार ? असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. राज्यात इयत्ता अकरावी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेदरम्यान न्यायालयाने वरील भाष्य केले. (how will you conduct CET exam for 11 class admission amid Corona rule Mumbai high court asked state government)

न्यायालय काय म्हणाले ?

राज्य सरकारनं अकरावी प्रवेशाबाबत 28 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकाला स्थगिती देण्याची मागणी अनन्या पत्की या आयसीएससीच्या विद्यार्थिनीनं केली आहे. त्यासाठी तिने आपले वडील अॅड. योगेश पत्की यांच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याच याचिकेवर आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी कोरोना नियमांकडे लक्ष वेधत कोर्टाने सरकारला काही प्रश्न विचारले. सध्या राज्यात कोरोना नियमांत शिथिलता नाही. मुंबईत लोकलने सामान्यांना प्रवास करण्यास परवानगी नाही. विद्यार्थ्यांचे सध्या लसीकरण झालेले नाही. त्यांनाही लोकलने प्रवास करण्यास परवानगी नाही, त्यामुळे सीईटीचे नियोजन कसे कराल ? असा सवाल कोर्टाने केला.

महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सरकारची बाजू मांडली

या याचिकेवरील पुढील सुनावणी मंगळवारी होईल. सुनावणीदरम्यान राज्य सरकारची बाजू महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मांडली. तर न्यायमूर्ती आर.डी. धानुका आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली.

एकूण 10 लाख 98 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज सीईटीसाठी पात्र

दरम्यान, राज्यात विहीत मुदतीत सीईटी परीक्षेसाठी एकूण अकरा लाख विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा अर्ज भरला आहे. त्यापैकी एकूण 76 हजार 86 विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण राहिले. तर 22 विद्यार्थ्यांनी अर्ज भरुनही तो सादर केला नाही. भरलेल्या एकूण अकरा लाख विद्यार्थ्यांपैकी एकूण 10 लाख 98 हजार विद्यार्थ्यांनी आपले अर्ज सादर केले आहेत. सीईटी परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 35 हजार 814 विद्यार्थी हे इतर मंडळाचे आहेत.

इतर बातम्या :

राहुल, सोनिया गांधी डिसेंबरमध्ये मुंबईत! महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसची महत्वाची बैठक, नेमकी काय चर्चा?

BREAKING : आशिष शेलार-अमित शाहांची दिल्लीत भेट, आता फडणवीस-चंद्रकांत पाटील तातडीने दिल्लीला जाणार?

Mumbai Local Train : भाजपच्या रेलभरो आंदोलनात रेल्वे पोलिसांकडून पत्रकारांना धक्काबुक्की, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

(how will you conduct CET exam for 11 class admission amid Corona rule Mumbai high court asked state government)