AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra FYJC CET 2021: अकरावीच्या सीईटीसाठी नोंदणीस मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करण्याची संधी

महाराष्ट्र सरकारनं अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचं जाहीर केलं आहे. अकरावी प्रवेशाच्या सीईटीसाठी नोंदणी करण्याची मुदत 2 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Maharashtra FYJC CET 2021: अकरावीच्या सीईटीसाठी नोंदणीस मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करण्याची संधी
अकरावी प्रवेश सीईटी
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jul 26, 2021 | 3:29 PM
Share

मुंबई: कोरोना विषाणू संसर्गामुळं यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. महाराष्ट्र सरकारनं अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचं जाहीर केलं आहे. अकरावी प्रवेशाच्या सीईटीसाठी नोंदणी करण्याची मुदत 2 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी अकरावी सीईटीसाठी नोंदणी करण्याची मुदत 26 जुलै पर्यंत होती.

वेबसाईट अद्याप बंद

दहावी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा द्यायची आहे. ते विद्यार्थी सीईटी परीक्षेची नोंदणी आज दुपारी तीन वाजल्यानंतर करु शकतात सांगण्यात आलं होतं. मात्र, अद्यापही वेबसाईट बंद असल्याचं समोर आलं आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अकरावी प्रवेशाची सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

तांत्रिक कारणामुळं नोंदणी प्रक्रिया ठप्प

अकरावी प्रवेशाच्या सीईटी परीक्षेसाठी नोंदणी सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवशी एक लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात नोंदणी करत असल्यानं सीईटी नोंदणीच्या वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे गेले काही दिवस वेबसाईट नोंदणीसाठी बंद ठेवण्यात आली होती. आता, वेबसाईटवर पुन्हा एकदा नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

राज्य मंडळांकडून प्रवेशासाठी सीइटीची प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी घेण्याचं निश्चित केलं आहे. बोर्डानं सीईटी परीक्षा ऑफलाईन घेण्याचं जाहीर केलं आहे. मात्र, विद्यार्थ्यांपर्यंत सीईटी परीक्षेची सविस्तर माहिती न पोहोचल्यानं परीक्षा ऑफलाइन की ऑनलाईन यावरुन विद्यार्थ्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे.

सीईटीची प्रक्रिया कशी असेल?

सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेतली जाईल. इंग्रजी, गणित (भाग 1 व 2), विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग 1 व 2) सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या प्रत्येक घटकावर प्रत्येकी 25 गुणांचे एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार आहेत. कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी विषयनिहाय 25 टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला असून या अभ्यासक्रमावर सीईटीमध्ये प्रश्न विचारले जातील. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी सीईटीसाठी परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, सीबीएसईसह इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी 178 रुपये शुल्क भरावे लागेल.

इतर बातम्या:

Maharashtra FYJC CET 2021: अकरावीच्या सीईटी परीक्षेसाठी पहिल्याच दिवशी एक लाख विद्यार्थ्यांचे अर्ज

Maharashtra FYJC CET 2021 : अकरावीच्या सीईटी परीक्षेबाबत नवा पेच, ICSE, IGCSE च्या विद्यार्थ्यांची शिक्षणमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

Maharashtra FYJC CET 2021 for class 11th admission registration dates extended till 2 August

Follow Us
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ